खेकडे पकडायला धरणावर गेले अन् घात झाला, मामा- भाच्यांचा भयावह मृत्यू; नेमकं काय घडलं?

Last Updated:

धरणात शोध घेतला मात्र हे तिघेही धरणाच्या खोल पाण्यात काठापासून दूर बुडाल्यानं रात्री त्यांचा शोध घेता आला नाही.

News18
News18
वाशिम : वाशिम च्या मंगरूळपीर तालुक्यातील सनगांव परिसरातील धरणात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मामा आणि सख्खे भाऊ असलेल्या दोन भाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.
सनगांव मधील सिद्धार्थ बनसोड ( वय 35 ) आणि त्यांचे दोन भाचे अंकुर राजेंद्र भालेराव ( वय 15 ) तसेच कार्तिक राजेंद्र भालेराव ( वय 12 ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंकुर आणि कार्तिकच्या शाळेला नाताळाची सुटी असल्याने ते मामाकडे गेले होते. मामासोबत सनगांव परिसरातील धरणात दुपारी खेकडे पकडण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुपार पासून हे तिघे सायंकाळ झाली तरी घरी परत न आल्यानं कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता या तिघांचे कपडे धरणाच्या काठावर होते.  धरणात शोध घेतला मात्र हे तिघेही धरणाच्या खोल पाण्यात काठापासून दूर बुडाल्यानं रात्री त्यांचा शोध घेता आला नाही.
advertisement

धरणावर पोहायला गेलेल्या मामा- भाचांसोबत काय घडलं?

आज पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांच्यासह त्यांच्या चमूने तलावात शोध घेतला असता अगोदर दोन सख्खे भाऊ आणि त्या नंतर काही अंतरावर त्यांच्या मामांचा खोल पाण्यातून मृतदेह शोधून वर काढला. धरणात मोठ्याप्रमाणात पाणी असल्यामुळे आणि पोहता येत नसल्यामुळे तिघांचा देखील पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.  या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळं भालेराव तसेच बनसोड परिवार मोठं संकट कोसळलं आहे. मामा आणि दोन सख्खे भाऊ असलेल्या भाच्यांचा अशा मृत्यू मुळं परिसरात शोककळा पसरली असुन पुढील तपास आसेंगांव पोलीस करत आहेत. . या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खेकडे पकडायला धरणावर गेले अन् घात झाला, मामा- भाच्यांचा भयावह मृत्यू; नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement