Astrology: डिसेंबरचा चौथा शनिवार कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, December 27, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशीभविष्य सांगितलं जातं. ग्रहस्थितीनुसार राशींवर कसा परिणाम असेल, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
1/12
मेष राशीसाठी आजचा दिवस एकूणच छान आहे. आज तुमच्यात वेगळीच ऊर्जा आणि उत्साह असेल. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांशी तुमचे संबंध अधिक चांगले होतील. तुमचे विचार सकारात्मक असतील आणि त्यामुळे प्रियजनांशी मोकळेपणाने बोलता येईल. आज एखादा नवीन उपक्रम किंवा काम सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. जुने मतभेद किंवा गैरसमज मिटवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. तुमचा उत्साह आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव घरातल्यांवर आणि मित्रांवरही पडेल. कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ आनंद देईल. मनातले विचार लपवू नका, कारण तुमचे बोलणे आज इतरांसाठी महत्त्वाचे ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने आजचा दिवस समाधान देणारा आहे. मनाचं ऐका आणि नाती अधिक घट्ट करा.लकी अंक: 7
लकी रंग: जांभळा
मेष राशीसाठी आजचा दिवस एकूणच छान आहे. आज तुमच्यात वेगळीच ऊर्जा आणि उत्साह असेल. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांशी तुमचे संबंध अधिक चांगले होतील. तुमचे विचार सकारात्मक असतील आणि त्यामुळे प्रियजनांशी मोकळेपणाने बोलता येईल. आज एखादा नवीन उपक्रम किंवा काम सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. जुने मतभेद किंवा गैरसमज मिटवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. तुमचा उत्साह आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव घरातल्यांवर आणि मित्रांवरही पडेल. कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ आनंद देईल. मनातले विचार लपवू नका, कारण तुमचे बोलणे आज इतरांसाठी महत्त्वाचे ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने आजचा दिवस समाधान देणारा आहे. मनाचं ऐका आणि नाती अधिक घट्ट करा.लकी अंक: 7लकी रंग: जांभळा
advertisement
2/12
वृषभ राशीसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. आजूबाजूचं वातावरण जड वाटू शकतं आणि त्यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. मात्र, ही वेळ स्वतःमधली ताकद ओळखण्याची आहे. नातेसंबंधांकडे लक्ष द्यावं लागेल. आज प्रियजनांशी संवाद महत्त्वाचा ठरेल. काही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे, पण त्याकडे संधी म्हणून पाहा. मनातल्या भावना स्पष्टपणे मांडल्यास परिस्थिती सुधारू शकते. नात्यात सकारात्मक विचार ठेवा आणि समोरच्याच्या भावना समजून घ्या. आज स्वतःसोबत वेळ घालवण्याची गरज आहे. हा दिवस तुम्हाला अंतर्मुख होण्यास आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत करेल. अडचणी या आयुष्याचा भाग आहेत आणि त्या तुम्हाला अधिक सक्षम बनवतात.लकी अंक: 6
लकी रंग: पिवळा
वृषभ राशीसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. आजूबाजूचं वातावरण जड वाटू शकतं आणि त्यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. मात्र, ही वेळ स्वतःमधली ताकद ओळखण्याची आहे. नातेसंबंधांकडे लक्ष द्यावं लागेल. आज प्रियजनांशी संवाद महत्त्वाचा ठरेल. काही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे, पण त्याकडे संधी म्हणून पाहा. मनातल्या भावना स्पष्टपणे मांडल्यास परिस्थिती सुधारू शकते. नात्यात सकारात्मक विचार ठेवा आणि समोरच्याच्या भावना समजून घ्या. आज स्वतःसोबत वेळ घालवण्याची गरज आहे. हा दिवस तुम्हाला अंतर्मुख होण्यास आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत करेल. अडचणी या आयुष्याचा भाग आहेत आणि त्या तुम्हाला अधिक सक्षम बनवतात.लकी अंक: 6लकी रंग: पिवळा
advertisement
3/12
मिथुन राशीसाठी आजचा दिवस थोडासा अस्वस्थ करणारा असू शकतो. मनात अनेक विचार चालू असतील आणि त्यामुळे गोंधळ जाणवू शकतो. आज स्वतःला स्थिर ठेवणं थोडं अवघड जाईल. याचा परिणाम नातेसंबंधांवरही होऊ शकतो. बोलताना किंवा संवाद साधताना गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शब्द जपून वापरा. भावना नीट व्यक्त करता येणार नाहीत असं वाटू शकतं. सर्जनशीलताही थोडी कमी वाटेल. अशा वेळी स्वतःला थोडी विश्रांती द्या. मन शांत करण्याचा प्रयत्न करा. थोडं ध्यान किंवा एकांतात वेळ घालवल्यास बरे वाटेल. या वेळेकडे स्वतःला समजून घेण्याची संधी म्हणून पाहा.लकी अंक: 2
लकी रंग: गुलाबी
मिथुन राशीसाठी आजचा दिवस थोडासा अस्वस्थ करणारा असू शकतो. मनात अनेक विचार चालू असतील आणि त्यामुळे गोंधळ जाणवू शकतो. आज स्वतःला स्थिर ठेवणं थोडं अवघड जाईल. याचा परिणाम नातेसंबंधांवरही होऊ शकतो. बोलताना किंवा संवाद साधताना गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शब्द जपून वापरा. भावना नीट व्यक्त करता येणार नाहीत असं वाटू शकतं. सर्जनशीलताही थोडी कमी वाटेल. अशा वेळी स्वतःला थोडी विश्रांती द्या. मन शांत करण्याचा प्रयत्न करा. थोडं ध्यान किंवा एकांतात वेळ घालवल्यास बरे वाटेल. या वेळेकडे स्वतःला समजून घेण्याची संधी म्हणून पाहा.लकी अंक: 2लकी रंग: गुलाबी
advertisement
4/12
कर्क राशीसाठी आजचा दिवस खास आहे. भावना आज अधिक खोलवर जाणवतील. आज निर्णय घेताना तुम्ही मनासोबत हृदयाचाही विचार कराल. नातेसंबंध नव्याने जोडण्याची ही चांगली वेळ आहे. घरचे लोक आणि जवळचे मित्र तुमच्यासोबत वेळ घालवायला उत्सुक असतील. त्यांची साथ तुम्हाला मानसिक समाधान देईल. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आधी दडपून ठेवलेलं काही असेल तर ते बोलून दाखवता येईल. त्यामुळे नात्यात अधिक समज आणि जवळीक निर्माण होईल. विश्वास आणि आपुलकी वाढेल. तुमची संवेदनशीलता आज नात्यांना अधिक मजबूत करेल. भावनिक नाती नव्याने जोडण्याची ही चांगली संधी आहे.लकी अंक: 5
लकी रंग: नारंगी
कर्क राशीसाठी आजचा दिवस खास आहे. भावना आज अधिक खोलवर जाणवतील. आज निर्णय घेताना तुम्ही मनासोबत हृदयाचाही विचार कराल. नातेसंबंध नव्याने जोडण्याची ही चांगली वेळ आहे. घरचे लोक आणि जवळचे मित्र तुमच्यासोबत वेळ घालवायला उत्सुक असतील. त्यांची साथ तुम्हाला मानसिक समाधान देईल. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आधी दडपून ठेवलेलं काही असेल तर ते बोलून दाखवता येईल. त्यामुळे नात्यात अधिक समज आणि जवळीक निर्माण होईल. विश्वास आणि आपुलकी वाढेल. तुमची संवेदनशीलता आज नात्यांना अधिक मजबूत करेल. भावनिक नाती नव्याने जोडण्याची ही चांगली संधी आहे.लकी अंक: 5लकी रंग: नारंगी
advertisement
5/12
सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. आज तुम्हाला आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा जाणवेल. त्यामुळे लोकांशी तुमचे संबंध अधिक चांगले होतील. मनातल्या भावना मोकळेपणाने मांडण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा सकारात्मक स्वभाव इतरांना आकर्षित करेल. आज सर्जनशीलता वाढलेली असेल. मित्र आणि कुटुंबासोबत छोटे छोटे आनंदाचे क्षण अनुभवता येतील. कुणाला काही सांगायचं राहिलं असेल तर आज ती संधी मिळू शकते. नात्यांमध्ये पुढचं पाऊल टाकण्यासाठी आज योग्य वेळ आहे. मनाचं ऐका आणि सकारात्मक बदल स्वीकारा. आज प्रेम, आपुलकी आणि आनंद यांचा अनुभव येईल.लकी अंक: 10
लकी रंग: निळा
सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. आज तुम्हाला आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा जाणवेल. त्यामुळे लोकांशी तुमचे संबंध अधिक चांगले होतील. मनातल्या भावना मोकळेपणाने मांडण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा सकारात्मक स्वभाव इतरांना आकर्षित करेल. आज सर्जनशीलता वाढलेली असेल. मित्र आणि कुटुंबासोबत छोटे छोटे आनंदाचे क्षण अनुभवता येतील. कुणाला काही सांगायचं राहिलं असेल तर आज ती संधी मिळू शकते. नात्यांमध्ये पुढचं पाऊल टाकण्यासाठी आज योग्य वेळ आहे. मनाचं ऐका आणि सकारात्मक बदल स्वीकारा. आज प्रेम, आपुलकी आणि आनंद यांचा अनुभव येईल.लकी अंक: 10लकी रंग: निळा
advertisement
6/12
कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडा कठीण वाटू शकतो. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अस्वस्थता जाणवू शकते. गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे संयम ठेवणं गरजेचं आहे. नातेसंबंधांत काही अडचणी येऊ शकतात. मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल. प्रियजनांशी मोकळेपणाने बोला. प्रामाणिक संवादामुळे गैरसमज दूर होतील. अडचणींतूनही काहीतरी शिकायला मिळतं हे लक्षात ठेवा. आज आत्मपरीक्षणासाठी चांगला दिवस आहे. मनाचा आवाज ऐका आणि आयुष्यात चढ-उतार येत असतात हे स्वीकारा. संतुलन ठेवल्यास मन शांत राहील आणि नातीही सुधारतील.लकी अंक: 4
लकी रंग: आकाशी निळा
कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडा कठीण वाटू शकतो. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अस्वस्थता जाणवू शकते. गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे संयम ठेवणं गरजेचं आहे. नातेसंबंधांत काही अडचणी येऊ शकतात. मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल. प्रियजनांशी मोकळेपणाने बोला. प्रामाणिक संवादामुळे गैरसमज दूर होतील. अडचणींतूनही काहीतरी शिकायला मिळतं हे लक्षात ठेवा. आज आत्मपरीक्षणासाठी चांगला दिवस आहे. मनाचा आवाज ऐका आणि आयुष्यात चढ-उतार येत असतात हे स्वीकारा. संतुलन ठेवल्यास मन शांत राहील आणि नातीही सुधारतील.लकी अंक: 4लकी रंग: आकाशी निळा
advertisement
7/12
तूळ राशीसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नातेसंबंधांत नवीन उत्साह जाणवेल. प्रियजनांशी संवाद चांगला होईल आणि मनातली अंतरं कमी होतील. अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी आजचा काळ योग्य आहे. तुमची समजूतदारपणा आणि संवेदनशीलता आज उपयोगी पडेल. आजूबाजूचं वातावरण सुखद असेल. छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद मिळेल. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आज योग्य वेळ आहे. नात्यांमधला सूर चांगला राहील. तुमच्यासोबतच प्रियजनांनाही आनंद मिळेल. समंजसपणा आणि सहकार्यामुळे नाती अधिक घट्ट होतील. आजचा दिवस मनमुराद एन्जॉय करा.लकी अंक: 11
लकी रंग: नेव्ही ब्लू
तूळ राशीसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नातेसंबंधांत नवीन उत्साह जाणवेल. प्रियजनांशी संवाद चांगला होईल आणि मनातली अंतरं कमी होतील. अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी आजचा काळ योग्य आहे. तुमची समजूतदारपणा आणि संवेदनशीलता आज उपयोगी पडेल. आजूबाजूचं वातावरण सुखद असेल. छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद मिळेल. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आज योग्य वेळ आहे. नात्यांमधला सूर चांगला राहील. तुमच्यासोबतच प्रियजनांनाही आनंद मिळेल. समंजसपणा आणि सहकार्यामुळे नाती अधिक घट्ट होतील. आजचा दिवस मनमुराद एन्जॉय करा.लकी अंक: 11लकी रंग: नेव्ही ब्लू
advertisement
8/12
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा तणावपूर्ण असू शकतो. नात्यांमध्ये समजुतीचा अभाव जाणवू शकतो. त्यामुळे मतभेद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. अशावेळी भावना मनात न ठेवता मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. संवाद वाढवल्यास परिस्थिती हलकी होईल. कधी कधी एकटेपणा जाणवू शकतो, पण प्रियजनांचा आधार घ्या. स्वतःमधली ताकद ओळखा आणि धीराने परिस्थितीला सामोरे जा. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात हे स्वीकारायला आज शिकायला मिळेल. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास नात्यात सुधारणा होईल. कठीण दिवसानंतर चांगले दिवस येतात हे लक्षात ठेवा.लकी अंक: 1
लकी रंग: हिरवा
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा तणावपूर्ण असू शकतो. नात्यांमध्ये समजुतीचा अभाव जाणवू शकतो. त्यामुळे मतभेद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. अशावेळी भावना मनात न ठेवता मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. संवाद वाढवल्यास परिस्थिती हलकी होईल. कधी कधी एकटेपणा जाणवू शकतो, पण प्रियजनांचा आधार घ्या. स्वतःमधली ताकद ओळखा आणि धीराने परिस्थितीला सामोरे जा. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात हे स्वीकारायला आज शिकायला मिळेल. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास नात्यात सुधारणा होईल. कठीण दिवसानंतर चांगले दिवस येतात हे लक्षात ठेवा.लकी अंक: 1लकी रंग: हिरवा
advertisement
9/12
धनु राशीसाठी आजचा दिवस खूप उत्साही आहे. तुम्ही जोशात आणि आनंदात असाल. तुमची सकारात्मक ऊर्जा आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देईल. नवी संधी मिळू शकते. कुटुंब आणि मित्रांसोबतचे क्षण नाती अधिक घट्ट करतील. निर्णय घेण्याची क्षमता आज चांगली राहील. तुमचा उत्साह आणि शहाणपण यामुळे नात्यांना मजबूत पाया मिळेल. नवीन नात्याचा विचार करत असाल तर आज योग्य दिवस आहे. भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. सुसंवाद आणि संतुलन ठेवा. आजचा दिवस नव्या सुरुवातीचा संकेत देतो. आत्मविश्वासाने पुढे जा.लकी अंक: 3
लकी रंग: गडद हिरवा
धनु राशीसाठी आजचा दिवस खूप उत्साही आहे. तुम्ही जोशात आणि आनंदात असाल. तुमची सकारात्मक ऊर्जा आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देईल. नवी संधी मिळू शकते. कुटुंब आणि मित्रांसोबतचे क्षण नाती अधिक घट्ट करतील. निर्णय घेण्याची क्षमता आज चांगली राहील. तुमचा उत्साह आणि शहाणपण यामुळे नात्यांना मजबूत पाया मिळेल. नवीन नात्याचा विचार करत असाल तर आज योग्य दिवस आहे. भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. सुसंवाद आणि संतुलन ठेवा. आजचा दिवस नव्या सुरुवातीचा संकेत देतो. आत्मविश्वासाने पुढे जा.लकी अंक: 3लकी रंग: गडद हिरवा
advertisement
10/12
मकर राशीसाठी आजचा दिवस बदल घेऊन येऊ शकतो. भावनिकदृष्ट्या थोडं जड वाटेल. जुन्या गोष्टींचा विचार मनात येऊ शकतो. याचा परिणाम नात्यांवरही होऊ शकतो. मात्र मनातलं बोलून दाखवल्यास हलकं वाटेल. मित्र किंवा कुटुंबाचा आधार घ्या. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. एखादी खोल समस्या असेल तर आज तिचा विचार करून स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न करा. हा दिवस स्वतःला समजून घेण्यासाठी आणि नात्यांची खोली जाणून घेण्यासाठी चांगला आहे. आयुष्यातील चढ-उतारातही नात्यांना महत्त्व द्या. आत्मपरीक्षणाचा हा काळ आहे. भावना स्वीकारा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा.लकी अंक: 9
लकी रंग: काळा
मकर राशीसाठी आजचा दिवस बदल घेऊन येऊ शकतो. भावनिकदृष्ट्या थोडं जड वाटेल. जुन्या गोष्टींचा विचार मनात येऊ शकतो. याचा परिणाम नात्यांवरही होऊ शकतो. मात्र मनातलं बोलून दाखवल्यास हलकं वाटेल. मित्र किंवा कुटुंबाचा आधार घ्या. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. एखादी खोल समस्या असेल तर आज तिचा विचार करून स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न करा. हा दिवस स्वतःला समजून घेण्यासाठी आणि नात्यांची खोली जाणून घेण्यासाठी चांगला आहे. आयुष्यातील चढ-उतारातही नात्यांना महत्त्व द्या. आत्मपरीक्षणाचा हा काळ आहे. भावना स्वीकारा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा.लकी अंक: 9लकी रंग: काळा
advertisement
11/12
कुंभ राशीसाठी आजचा दिवस थोडासा कठीण वाटू शकतो. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे मानसिक गोंधळ होऊ शकतो. ही अवस्था कायमची नाही, पण भावनिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नात्यांमध्ये तणाव जाणवू शकतो. संवाद करताना संवेदनशीलतेचा अभाव जाणवू शकतो, त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा आणि संवाद सुधारण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील विचार थोडे विस्कळीत वाटतील. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. बदल आणि नव्या कल्पनांचा विचार करा. ध्यान किंवा शांततेत वेळ घालवल्यास मन स्थिर होईल. ही वेळ तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं ओळखायला मदत करेल.लकी अंक: 8
लकी रंग: लाल
कुंभ राशीसाठी आजचा दिवस थोडासा कठीण वाटू शकतो. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे मानसिक गोंधळ होऊ शकतो. ही अवस्था कायमची नाही, पण भावनिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नात्यांमध्ये तणाव जाणवू शकतो. संवाद करताना संवेदनशीलतेचा अभाव जाणवू शकतो, त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा आणि संवाद सुधारण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील विचार थोडे विस्कळीत वाटतील. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. बदल आणि नव्या कल्पनांचा विचार करा. ध्यान किंवा शांततेत वेळ घालवल्यास मन स्थिर होईल. ही वेळ तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं ओळखायला मदत करेल.लकी अंक: 8लकी रंग: लाल
advertisement
12/12
मीन राशीसाठी आजचा दिवस एकूणच सकारात्मक आहे. आजूबाजूची ऊर्जा नातेसंबंध मजबूत करण्यास मदत करेल. नव्या सुरुवातीसाठी हा चांगला काळ आहे. प्रियजनांशी भावनिक आणि मानसिक जवळीक वाढेल. भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील. तुमचा संवेदनशील स्वभाव आज इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत करेल. मित्र आणि कुटुंबाशी नाती अधिक घट्ट होतील. भावना शेअर करण्यासाठी आज योग्य वेळ आहे. सर्जनशीलता आणि भावनिक समज वाढलेली असेल. नात्यांमध्ये अधिक रंग भराल. सकारात्मकता ठेवा आणि जवळीक जपा. आजचा दिवस आनंद, समाधान आणि आपुलकी देणारा आहे. प्रियजनांसोबत वेळ घालवून हा दिवस खास करा.लकी अंक: 5
लकी रंग: पांढरा
मीन राशीसाठी आजचा दिवस एकूणच सकारात्मक आहे. आजूबाजूची ऊर्जा नातेसंबंध मजबूत करण्यास मदत करेल. नव्या सुरुवातीसाठी हा चांगला काळ आहे. प्रियजनांशी भावनिक आणि मानसिक जवळीक वाढेल. भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील. तुमचा संवेदनशील स्वभाव आज इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत करेल. मित्र आणि कुटुंबाशी नाती अधिक घट्ट होतील. भावना शेअर करण्यासाठी आज योग्य वेळ आहे. सर्जनशीलता आणि भावनिक समज वाढलेली असेल. नात्यांमध्ये अधिक रंग भराल. सकारात्मकता ठेवा आणि जवळीक जपा. आजचा दिवस आनंद, समाधान आणि आपुलकी देणारा आहे. प्रियजनांसोबत वेळ घालवून हा दिवस खास करा.लकी अंक: 5लकी रंग: पांढरा
advertisement
Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement