Weather Update: दसऱ्याआधी पावसाचं मोठं संकट! पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे कारण ठरला आहे. रायगड पुणे रेड अलर्टवर आहेत, मुंबई ठाणे उपनगरात पाऊस सुरू आहे. नागरिक सतर्क राहा.
मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची तीव्रता वाढत आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू पश्चिमेकडे पुढे सरकत आहे. त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात पुढचे चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस राहणार आहे. २६ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजता ही 'डिप्रेशन' प्रणाली वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात, दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ केंद्रित झाली आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली.
बंगालच्या उपसागरातील या तीव्र प्रणालीमुळे महाराष्ट्रात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान खात्याचे अंदाज आणि सूचना लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
बे ऑफ बंगालमध्ये पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रापर्यंत होणार आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस अति मुसळधार पावसाचे राहणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला आहे. 5 ऑक्टोबर ऐवजी आता 10 ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल.मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
28 सप्टेंबर रोजी रायगड आणि पुण्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. बीड, लातूर , परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. भेदरलेल्या लोकांनी कालची रात्र जागून काढली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह रात्रभर पाऊस बरसतोय. पाऊस थांबावा अशी प्रार्थना करतोय. शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आणणारी रात्र होती.
advertisement
मागच्या चार ते पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र पुन्हा पावसाचा जोर चार दिवस वाढणार असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
के एस होसाळीकर यांनी वर्तवलेला अंदाज
27 सप्टेंबर: काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.
28 सप्टेंबर: काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता.
advertisement
26, 27 सप्टेंबर: विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
27, 28 सप्टेंबर: मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 7:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: दसऱ्याआधी पावसाचं मोठं संकट! पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा