1,77,00,000 रुपयांना नाशिकमध्ये तिघांना लुटलं, WhatsApp वापरून Share Trading चा सापळा

Last Updated:

नाशिकमध्ये व्हॉट्सॲपवर बनावट ट्रेडिंग ग्रुपद्वारे अनन्या शर्मा, वंशिका गिल, नविशा सनयम यांनी तिघांना १ कोटी ७७ लाख रुपयांची फसवणूक केली, सायबर पोलिस तपास सुरू.

News18
News18
सध्या सोनं चांदी आणि ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळत असल्याने आजकाल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल आहे. ऑनलाईन व्हिडीओ पाहून, इन्स्टा किंवा टेलिग्राम सारखे माध्यमं वापरून पैसे गुंतवले जातात. आता WhatsApp ग्रूपच्या माध्यमातून देखील हे प्रकार होत आहेत. मात्र त्यातून काहीवेळा नुकसान देखील होतं. नाशिकमध्ये असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
ऑनलाइन शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत व्हॉट्सॲपद्वारे उभारलेल्या बनावट ट्रेडिंग ग्रुपच्या माध्यमातून सायबर टोळीने नाशिकमधील तिघांना तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
नाशिक शहरातील एका व्यावसायिकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या व्हॉट्सॲपवर अचानक एका शेअर मार्केट ग्रुपमध्ये समाविष्ट केल्याचा मेसेज आला. या ग्रुपमध्ये स्वतःला नामांकित ‘नुवामा’ कंपनीचे शेअर ब्रोकर्स असल्याचे सांगणाऱ्या अनन्या शर्मा, वंशिका गिल आणि नविशा सनयम या नावांच्या व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी ऑनलाइन शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.
advertisement
हळूहळू या तथाकथित ब्रोकर्सनी शेअर मार्केटमधील लिस्टेड कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगत विविध बँक खात्यांत ऑनलाइन रक्कम भरण्यास सांगितले. सुरुवातीला काही बनावट नफ्याचे आकडे आणि स्क्रीनशॉट पाठवून विश्वास वाढवण्यात आला. त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यास भाग पाडत तिघांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले.
या फसवणुकीत सर्वाधिक नुकसान एका साडी विक्रेत्या व्यावसायिकाचे झाले असून त्यांनी १ कोटी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली. याशिवाय खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीची ५८ लाख रुपयांची, तर अन्य एका गुंतवणूकदाराची ९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. ठराविक टप्प्यानंतर पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक अडचणींची कारणे देत संपर्क तोडण्यात आला.
advertisement
सायबर पोलिसांकडून प्राथमिक तपासात महत्त्वाची बाब समोर आली आहे. अशा व्हॉट्सॲप शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये बहुतांश वेळा हॅकर्सच वेगवेगळ्या नावांनी सदस्य म्हणून उपस्थित असतात. हे आरोपी आपल्याला झालेल्या नफ्याची खोटी माहिती देतात. शेअरच्या वाढलेल्या किंमती, मोठा नफा आणि मार्केटमधील चढ उतार दाखवणारे बनावट स्क्रीनशॉट्स शेअर करून इतर सदस्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले जाते.
advertisement
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम शेअर ट्रेडिंग ग्रुपवर विश्वास ठेवू नये. मोठ्या नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या ऑनलाईन ऑफर्सपासून सावध राहावे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
1,77,00,000 रुपयांना नाशिकमध्ये तिघांना लुटलं, WhatsApp वापरून Share Trading चा सापळा
Next Article
advertisement
BMC Election: मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! मुंबई महापालिका निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण काय?
मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का
  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

View All
advertisement