School Student: तुमचे मुलंही शाळेत जाण्यास नकार देतात? मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला मोलाचा सल्ला
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
सध्याला मानसिक आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये मोठ्यांसह लहानांचा देखील समावेश आहे. लहान मुलं शाळेमध्ये न जाण्याचे किंवा डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रमाण अधिक वाढत चालले असल्याचं एका डॉक्टरांच्या सर्वेक्षणातून लक्षात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर: सध्याला मानसिक आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये मोठ्यांसह लहानांचा देखील समावेश आहे. लहान मुलं शाळेमध्ये न जाण्याचे किंवा डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रमाण अधिक वाढत चालले असल्याचं एका डॉक्टरांच्या सर्वेक्षणातून लक्षात आले आहे. तर यावरती नेमकी काय काळजी घेतली पाहिजे किंवा कसं यातून आपल्या मुलांना बाहेर काढायला पाहिजे याविषयी आपल्याला सविस्तर माहिती सांगितलेली आहे माणूस उपचार तज्ञ डॉक्टर रश्मीन आचलिया यांनी...
मुलांमध्ये शाळेत न जाणे किंवा शाळेत जाण्याची भीती बसणे हा देखील एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या मागे विविध कारणे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल मुलांचा मोबाईल बघण्याचा प्रमाण वाढत आहे, यामुळे देखील मुलांना शाळेत जा वाटत नाही. त्यासोबतच विभक्त कुटुंब पद्धती त्या सोबतच आई- वडिलांचे देखील मुलांबरोबर वेळ न घालवणे किंवा जास्त वेळा मोबाईलवर घालवणे यामुळे देखील मुलं हे एकटे पडतात आणि त्यामुळे देखील त्यांना डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. शाळेत अभ्यास नाही झाला, कुठल्या विषयात कमी मार्क आले यामुळे शिक्षक रागवतील त्या भीतीने देखील मुलं ही शाळेत जात नाही आहेत.
advertisement
जर असं काही मुलांना होत असेल तर वेळीच त्यांना योग्य उपचार देणे गरजेचे आहे. त्यांचे काऊन्सिलिंग करणे गरजेचे आहे. यावर उपचार म्हणजे की पालकांनी आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करावा, त्यांना समजून घ्यावे आणि यामध्ये शिक्षकाने देखील विद्यार्थ्यांना समजून घेणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. त्यांना समजून घेणे किंवा त्यांना शाळेमध्ये येण्याची परवानगी देणे त्यांना कुठल्याही प्रकारचा अभ्यासाचा ताण देऊ नये. असे जर केले तर ते विद्यार्थी लवकरात लवकर तणावमुक्त राहतील आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतील, असं मानसोपचार तज्ञांनी सांगितला आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 10, 2025 4:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
School Student: तुमचे मुलंही शाळेत जाण्यास नकार देतात? मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला मोलाचा सल्ला