Dombivli: कन्नड भाषेत शिवी का दिली? 8 जणांनी मिळून दोघांना बेदम मारलं, बारबाहेर तुफान राडा VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
रेतीबंदर रोडवर असलेल्या अतिथी बारबाहेर मध्यरात्री एका किरकोळ वादातून दोन गटामध्ये वाद झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
डोंबिवली: कल्याण डोंबिवली परिसरात क्षुल्लक कारणावरून कधी काय वाद होईल, याचा नेम नाही. अशीच एक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. कन्नड भाषेत शिवीगाळ केली म्हणून एका बार बाहेर दोन गटामध्ये तुफान मारामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारामारीमध्ये २ तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील रेतीबंदर रोडवर असलेल्या अतिथी बारबाहेर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.
डोंबिवलीमधील घटना, बारबाहेर टोळक्याने २ तरुणांना केली मारहाण pic.twitter.com/ZOGmzK9PTf
— VIRALबाबा (@viralmedia70) March 31, 2026
रेतीबंदर रोडवर असलेल्या अतिथी बारबाहेर मध्यरात्री एका किरकोळ वादातून दोन गटामध्ये वाद झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. बारमध्ये कन्नड भाषेत शिवीगाळ केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने २ तरुणासोबत वाद झाला. त्यानंतर या इसमाने आपल्या ७-८ साथीदारांना बारमध्ये बोलावलं. ७ ते ८ जण जमा झााल्यानंतर या दोन्ही तरुणांना बारच्या बाहेर काढण्यात आलं. बारच्या दारावर दोन्ही तरुणाशी बोलणं सुरू होतं, त्यावेळी अचानक एकाने समोरील तरुणाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर या टोळक्याने दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली.
advertisement
या टोळक्याने हाती लागेल ते साहित्य उचलून दोघांना मारहाण केली. लोखंडी वस्तू आणि झाडाच्या कुंड्यांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, या झटापटीत एका तरुणाची ८ ग्रॅम सोन्याची साखळी देखील गहाळ झाली आहे. याप्रकरणी डोंबिवली पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 6:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivli: कन्नड भाषेत शिवी का दिली? 8 जणांनी मिळून दोघांना बेदम मारलं, बारबाहेर तुफान राडा VIDEO








