Budget 2024 : मोबाईलच्या किंमती कमी होणार? पाहा किती स्वस्तात मिळणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मोबाईल फोन आणि चार्जरच्या किंमती कमी करण्यासाठी मोबाईल आणि चार्जरवरील सीमा शुल्कात कपात केलीय. याआधी मोबाईल आणि चार्जरवर २० टक्के सीमा शुल्क आकारला जात असे.
दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केलं. अर्थसंकल्पात रोजगार, कौशल्य विकासासह अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्पाच्या भाषणात मोठ्या घोषणा करताना सोने आणि चांदीच्या सीमा शुल्क करात कपात करण्यात आलीय. याशिवाय मोबाईल फोन आणि चार्जरच्या किंमती कमी करण्यासाठी मोबाईल आणि चार्जरवरील अबकारी करात कपात केलीय. याआधी मोबाईल आणि चार्जरवर २० टक्के सीमा शुल्क आकारला जात असे. तो आता १५ टक्के इतका कर द्यावा लागेल. यामुळे मोबाईल फोन आणि चार्जरच्या किंमतीत ५ टक्के घसरण होईल.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोबाईल घेणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मोबाईलच्या किंमती कमी होतील. एखाद्या फोनची किंमत २० हजार रुपये असेल तर त्यावर २० टक्के सीमा शुल्क आकारला जायचा. त्यामुळे ४ हजार सीमा शुल्क लागल्यानं फोनची किंमत २४ हजार होईल. पण आता ५ टक्के कपात झाल्यानं सीमा शुल्क ३ हजार रुपये इतका होईल. यामुळे २४ हजार रुपयांना मिळणारा फोन २३ हजार रुपयांना मिळेल.
advertisement
चार्जरच्या किंमतीही कमी होणार आहेत. मोबाईल फोनप्रमाणेच चार्जरवरही सीमा शुल्क ५ टक्के कपात केली आहे. एखादा चार्जर १ हजार रुपयांचा असेल तर त्यावर २० टक्क्यांनुसार २०० रुपये सीमा शुल्क लागायचा. त्यामुळे चार्जर १२०० रुपयांपर्यंत घ्यावा लागत असे. आता मात्र सीमा शुल्क १५ टक्के झाल्यानं १५० रुपयेच कर लागेल. १ हजार रुपयांचा चार्जर आणि त्यावर १५० रुपये अबकारी कर यासह तुम्हाला 1150 रुपये मोजावे लागतील.
advertisement
मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता
पीसीबीएवरील करामध्ये सुमारे 10 ते 15 टक्के वाढ करण्यात येईल अशी शक्यता आहे. टेलिकॉम इक्विपमेंट्सच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मोबाइल वापरणाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. हा परिणाम अप्रत्यक्ष असेल आणि त्यात ऑपरेशनल कॉस्ट वाढण्याची शक्यताही आहे. काही काळासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून दरवाढही केली जाऊ शकते. त्यामुळे 5G रोलआउटवरही परिणाम होणं शक्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 23, 2024 5:08 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Budget 2024 : मोबाईलच्या किंमती कमी होणार? पाहा किती स्वस्तात मिळणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा








