फक्त 10 गुंठे शेतीत शेतकऱ्याने केली कमाल, तब्बल 6 पट कमावला नफा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
त्यांनी सांगितले की, मागील 2 महिन्यात फक्त 10 गुंठे शेतीतून त्यांनी तब्बल 2 लाख रुपयांची कमाई केली आहे.
भास्कर ठाकुर, प्रतिनिधी
सीतामढी, 20 नोव्हेंबर : पारंपरिक शेतीपेक्षा काही शेती अशी आहे जी कमी कालावधीत खूप जास्त नफा देत आहे. आज अशाच एका शेतकऱ्याची कथा जाणून घेऊयात, ज्यांनी फक्त 10 गुंठ्यात पारंपरिक शेतीच्या तुलनेत तब्बल 6 पट नफा कमावला.
मुकेश सिंह असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते बिहारच्या सितामढी जिल्ह्यातील बैरहा गावातील रहिवासी आहेत. त्यांनी फक्त 10 गुंठे शेतीत फूलशेती करुन चांगली कमाई केली आहे. त्यांनी सांगितले की ते झेंडूच्या फुलाची शेती करत आहेत. सोबतच लिंबू आणि पपईचीही शेती करत आहेत. त्यांच्या शेतीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
advertisement
मुकेश सिंह यांनी सांगितले की, वर्तमानात सर्व शेतात कमी फूल निघत आहेत. मात्र, मुकेश यांच्या बागेतून चांगल्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. याठिकाणी खूप सुंदर दृश्य दिसत आहे. त्यांना फूल लागवडीची आवड होती. या आवडीला त्यांनी व्यावसायिक स्वरुप दिले. इतर शेतकरी एक बिघा शेतीतून जितके उत्पादन घेत नाहीत, तितके ते फक्त 10 गुंठे शेतीतून घेत आहेत. प्रत्येक दुसऱ्या दिवशी एक क्विंटल फुलाचे उत्पादन होत आहेत. याच कारणाने इतर लोकही आता त्यांच्या शेतीचा पॅटर्न स्विकारत आहेत.
advertisement
त्यांनी सांगितले की, मागील 2 महिन्यात फक्त 10 गुंठे शेतीतून त्यांनी तब्बल 2 लाख रुपयांची कमाई केली आहे. वार्षिक 8 लाख रुपयांची आणखी कमाई होऊ शकते. यानंतर आता आणखी 5 गुंठे क्षेत्रात ते फूल शेती करणार आहेत.
Location :
Bihar Sharif,Nalanda,Bihar
First Published :
November 20, 2023 9:22 AM IST