सावकाराच्या तावडीतून जमीन सोडवण्यासाठी काय कराल? गप्प बसू नका, तक्रार करा!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
नोंदणीकृत सावकारांनी किती व्याज घ्यावा याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सावकारानं अधिकचं व्याज घेतल्याचं आढळल्यास आपण निश्चितच तक्रार करू शकता.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : शेतकऱ्यांनो, जर तुम्ही खासगी सावकाराकडून कर्ज घेतलं असेल आणि सावकारानं तुमची जमीन, मालमत्ता हडपली असेल तर याबाबत तक्रार करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. अनेक शेतकरी बांधव माहितीअभावी आपल्यावर होणारा अन्याय, आपली फसवणूक मुकाट्यानं सहन करतात. मात्र तुम्ही सर्वांपैकी एक होऊ नका. अन्यायाविरोधात आवाज उठवा.
बहुतांश प्रकरणांमध्ये खासगी सावकार अधिकचे व्याज आकारतात आणि शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेली जमीन, मालमत्ता हडपतात असं सर्रास आढळून येतं. याबाबत तक्रार कुठे करायची याची पुरेशी माहिती शेतकऱ्यांना नसते. मात्र आपण अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात तक्रार करू शकता. त्यानंतर पुढील कारवाई केली जाते.
advertisement
नोंदणीकृत सावकारांनी किती व्याज घ्यावा याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सावकारानं अधिकचं व्याज घेतल्याचं आढळल्यास आपण निश्चितच तक्रार करू शकता. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2024 कायदा अंमलात आल्यापासून आजवर अशा 561 तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यापैकी 438 तक्रारी निकालात काढण्यात आल्या. अशा प्रकरणांमध्ये आतापर्यंत 16 गुन्हेही दाखल झाले आहेत.
advertisement
52 शेतकऱ्यांना मिळाल्या जमिनी परत!
अवैध सावकारी प्रकरणात येणाऱ्या तक्रारींची चौकशी करून कारवाई केली जाते. जिल्ह्यात आजवर अशा 54 शेतकऱ्यांना 54 हेक्टर 43 आर जमीन पुन्हा मिळवून दिली आहे. तर, इतर काही प्रकरणांत चौकशी सुरू आहे.
advertisement
सावकार किती व्याज घेऊ शकतात?
नोंदणीकृत सावकार शेतीसाठी तारण कर्ज 9 टक्के आणि विना तारण कर्ज 12 टक्के व्याज घेतात. बिगर शेतीसाठी तारण कर्ज 15 टक्के, विना तारण कर्ज 18 टक्के व्याज घेऊ शकतात. जालना जिल्हा उपनिबंधक पी. बी. वरखडे यांनी ही माहिती दिली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 17, 2024 9:58 AM IST