शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! विहिरीसाठी मिळतं 4 लाखांचं अनुदान, संपूर्ण माहिती
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
दूध उत्पादक आणि पशूपालक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीनं गाय गोठ्यासाठी अनुदान दिलं जातं. जनावरांच्या संख्येनुसार अधिकचं अनुदान मिळतं.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : महाराष्ट्र शासनाच्यावतीनं सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सिंचन विहिरी देण्यात येतात. या विहिरीसाठीच्या अनुदानाची मर्यादा वाढवण्यात आली असून आता 4 लाख रुपयांचं अनुदान दिलं जातंय. 'मनरेगा' (MNREGA) अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत असून याबाबत ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयात अधिक माहिती मिळू शकते.
दूध उत्पादक आणि पशूपालक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीनं गाय गोठ्यासाठी अनुदान दिलं जातं. यात शासनाकडून 2 ते 6 जनावरांचा 1 गोठा बांधण्यासाठी 77 हजार रुपयांचं अनुदान मिळतं.
advertisement
सिंचन विहीर किंवा गाय गोठा या योजनांचा मनरेगा अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगा योजनेच्या निकषानुसार कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
सिंचन विहिरीसाठी आधी 3 लाख रुपयांचं अनुदान मिळत होतं. आता त्यात वाढ करण्यात आली असून विहिरीसाठी 4 लाख रुपयांचं अनुदान मिळतंय. तर, गाय गोठ्यासाठी 77 हजार रुपये आणि जनावरांच्या संख्येनुसार अधिकचं अनुदान मिळतं. गरजू शेतकऱ्यांनी याबाबत ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन भूम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी केलं.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 01, 2024 7:58 AM IST