6 फुटांचा सोन्या दिवसाला कमावतोय 10 हजार, बैलाच्या किमतीत येईल मर्सिडीज, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कृषी प्रदर्शनांत एक खिलार बैल सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: संपूर्ण भारतात पूर्वीपासूनच बैलाच्या साह्याने पारंपारिक शेती केली जाते. अनेक शेतकरी हे शेती आणि शर्यतीसाठी बैल पाळतात. विशेष म्हणजे या बैलांची एखाद्या अपत्याप्रमाणे काळजी घेतली जाते. अलिकडे यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराडच्या कृषी प्रदर्शनात एक खिलार बैल सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. 6 फूट उंचीचा हा धिप्पाड सोन्या सोन्याच्या मोलाचाच आहे. सर्वात उंच बैल म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्याची ख्याती आहे. विविध कृषी प्रदर्शनांत तो पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेतोय.
advertisement
सोन्या मुळचा सांगली जिल्ह्यातील
कराडच्या कृषी प्रदर्शनात सर्वांचं लक्ष वेधणारा सोन्या बैल मुळचा सांगली जिल्ह्यातील आहे. शेतकरी विद्यानंद आवटी यांनी त्याचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलाय. सोन्या बैल लहान अशताना सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून त्यांनी विकत घेतला. तो दीड वर्षांचा असताना त्याची किंमत साडेतीन लाख रुपये होती. आता सोन्याच्या किमतीत मर्सिडिज येईल. चार वर्षांच्या बैलाची किंमत 45 लाखांच्या घरात आहे, असे आवटी सांगतात.
advertisement
कसा असतो खुराक?
पिळदार शरीर आणि धिप्पाड असणाऱ्या सोन्याचा खुराकही तगडा आहे. त्याचा दिवसाचा खर्च 1800 ते 2 हजार रुपये एवढा आहे. सोन्याचा खुराक पहाटे पासून सुरू होतो. त्याला सहा प्रकारचे धान्य, शेंग पेंड, दूध, करडीचे तेल, अंडी असा रोजचा खुराक दिला जातो, असे विद्यानंद यांनी सांगितले.
advertisement
दिवसाला दहा हजारांची कमाई
view commentsया बैलाचा मुख्य वापर हा ब्रिडिंग करण्यासाठी होतो. एका गायीच्या दुपण्यासाठी 2000 रूपये घेतात. अशी दिवसात चार ते पाच गाईच्या माध्यमातून दिवसाचे दहा हजार रुपये सोन्या बैल कमवून देतो. त्यामुळे खर्च जावूनही सोन्या चांगले पैसे मिळवून देतो, असे मालक विद्यानंद आवटी सांगतात.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
January 24, 2024 8:32 PM IST

