अक्षय्य तृतीयेला सोनं घ्यावं की चांदी? जास्त रिटर्न्स देणारा पर्याय कोणता? एक्सपर्टने थेट सांगितलं

Last Updated:

अक्षय तृतीयेला सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. IBJA नुसार 99.99% शुद्धतेचं सोने 96,286 रुपये प्रति 10 ग्रॅमने उघडलं. अजय लखोटिया यांनी गोल्ड ETF, म्युच्युअल फंड किंवा डिजिटल गोल्ड गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

News18
News18
आज अक्षय तृतीया. सुवर्ण खरेदीसाठी शुभ मानला जाणारा दिवस. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. देशभरात दागिन्यांच्या दुकानांबाहेर गर्दी पाहायला मिळते आहे. मात्र यंदाच्या अक्षय तृतीयेला बाजारात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, त्यातच सोनं खरेदी करायचं, की गुंतवणुकीचा दुसरा पर्याय निवडायचा असा प्रश्न ज्यांना पडला आहे त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
आज सकाळी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार 99.99% शुद्धतेचं सोने 96,286 रुपये प्रति 10 ग्रॅमने उघडलं आणि दिवस अखेरीस 96,011 रुपयांवर बंद झालं. सोमवारी हेच सोने 95,420 वर उघडलं आणि 95,108 रुपये दराने बंद झालं होतं. म्हणजेच, किंमती थोडी वरखाली होत असल्या तरी अजूनही त्या उच्च पातळीवर आहेत. अक्षय्य तृतीयेमुळे आज हे दर थोडे वाढले असून 97 हजार 998 रुपयांवर दर पोहोचले आहेत. तर GST सह हेच दर 98 हजार 773 रुपये आहेत.
advertisement
स्टॉकग्रोचे संस्थापक आणि CEO अजय लखोटिया यांनी यंदाच्या अक्षय तृतीयेस गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, दागिन्यांऐवजी गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड किंवा डिजिटल गोल्ड यांसारखे पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतात. लखोटिया म्हणतात, “दागिने खरेदीत घडणावळ, सुरक्षेची चिंता आणि पुन्हा विक्रीची मर्यादा असते. पण डिजिटल पर्यायांमध्ये हे टाळता येतं. शिवाय थोड्या रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करता येते.”
advertisement
सोनं नाही तर चांदीतही करा गुंतवणूक
तांत्रिक उपकरणे, इलेक्ट्रिक वाहनं आणि औद्योगिक वापरात वाढत्या मागणीमुळे चांदीचे दरही झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना एकाच धातूवर लक्ष केंद्रित न करता, सोनं आणि चांदीचं संतुलन राखणं फायदेशीर ठरू शकतं. तसं पाहायला गेलं तर सोन्यापेक्षा चांदी दीर्घकाळासाठी चांगले रिटर्न्स देऊ शकते त्यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील.
advertisement
अक्षय तृतीयेस परंपरेप्रमाणे थोडे दागिने खरेदी करणं काही चुकीचं नाही. पण मोठ्या रकमेची गुंतवणूक करताना आजच्या बाजारस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. दागिने परंपरेसाठी, पण गुंतवणुकीसाठी ETF किंवा डिजिटल फॉर्म, असा संतुलित दृष्टिकोन तुमचं आर्थिक आरोग्य मजबूत करू शकतो. दागिने खरेदी करण्याऐवजी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं विचार केला तर फायद्याचा ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
अक्षय्य तृतीयेला सोनं घ्यावं की चांदी? जास्त रिटर्न्स देणारा पर्याय कोणता? एक्सपर्टने थेट सांगितलं
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement