Akshaya Tritiya: सोनं घेणं परवडत नाही, 50 रुपयांच्या छोट्या वस्तूनं होईल मोठा धनलाभ
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोन्याचे दर वाढल्यामुळे अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं कठीण झालं आहे. मात्र, 50 रुपयांत श्रीयंत्र, पिवळा शंख किंवा मातीचा मडकं खरेदी करून पूजा करता येते.
मुंबई: सोनं आणि स्त्री यांचं नातं अपरंपार आणि जुनं आहे. त्यात सण म्हटलं की दागिना घ्यायचं डोक्यात येतंच, पण सध्याची परिस्थिती पाहता, दागिना सोडाच एक ग्रॅम सोनं खरेदी करणंही मुश्कील झालं आहे. सोन्याचे दर दीड हजार रुपयांनी कमी झाले असले तरी अजूनही खिशाला पडवण्याएवढे घसरले नाहीत. अजूनही सोनं 95 हजार रुपये तोळावर आहे. एक ग्रॅमदेखील घेणं काही जणांना परवडणार नाही.
मग अशावेळी अक्षय्य तृतीया साजरी कशी करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा! तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे तुमच्याकडे सोनं घ्यायला पैसे नसतील तर काही हरकत नाही तुम्ही अगदी 50 रुपयांमध्ये तुमच्या घरात शुभ मुहूर्ताला एक वस्तू खरेदी करु शकता आणि त्याची पूजा करू शकता. त्यामुळेही घरात धनधान्य समृद्धी टिकून राहील.
advertisement
धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला. तसेच सतयुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग यांची सुरूवातही याच दिवसापासून झाली असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी दानधर्माचे फार मोठे महत्त्व आहे. विशेषतः या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की सोने खरेदी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कायमस्वरूपी सुख-समृद्धी नांदते.
advertisement
यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी बुधवारच्या दिवशी साजरी होणार आहे. यंदा रोहिणी नक्षत्र, शोभन योग आणि चंद्रमा वृषभ राशीत उच्चस्थानी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी रोहिणी नक्षत्राचे योग जुळल्यास 'सर्वार्थसिद्धी योग' तयार होतो, ज्यामुळे कोणतेही शुभकार्य जसे की विवाह, गृहप्रवेश, नवीन प्रतिष्ठान सुरू करणे इत्यादी, मुहूर्त न पाहताही करता येते.
advertisement
जर तुम्ही महागाई किंवा आर्थिक मर्यादांमुळे सोने खरेदी करू शकत नसाल, तर चिंता करू नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र, पिवळा शंख किंवा मातीचा मडकंही खरेदी करणे शुभ मानले जाते. इतकंच नाही तर पिवळ्या कवड्या देखील तुम्ही खरेदी करू शकता. या वस्तू सहज आणि स्वस्त उपलब्ध होतात आणि त्यांची खरेदी केल्यानेही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा लाभते, असा समज आहे.
advertisement
एकंदरीत, अक्षय तृतीयेचा दिवस हा केवळ सोने खरेदीपुरता मर्यादित नाही, तर तो नवा शुभारंभ, नवा संकल्पासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या दिवशी योग्य निर्णय घेऊन आपले जीवन समृद्धतेकडे नेण्याची संधी साधायला हवी असंही सांगितलं जातं. त्यामुळे कर्ज काढून सोनं खरेदीचा अट्टाहास करण्यापेक्षा 50 रुपयांत तुम्ही या वस्तू अगदी सहज खरेदी करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 28, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Akshaya Tritiya: सोनं घेणं परवडत नाही, 50 रुपयांच्या छोट्या वस्तूनं होईल मोठा धनलाभ