Bank Holiday: आठवड्यातला तिसरा शनिवार पण ईदमुळे बँक बंद राहणार की सुरू?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आठवड्यातला तिसरा शनिवार म्हणजे बँका सुरू राहणार असा सर्वसाधारण अंदाज असेल तर थांबा, उद्या ईद आहे. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी सुट्टी देण्यात आली आहे.
हा आठवडा सण आणि सुट्ट्यांचा आहे. लाँग विकेण्डमुळे अनेक ठिकाणी बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवड्यातला तिसरा शनिवार म्हणजे बँका सुरू राहणार असा सर्वसाधारण अंदाज असेल तर थांबा, उद्या ईद आहे. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यांनुसार सुट्टीचं गणित बदलण्याची शक्यता आहे. मार्च महिना म्हटलं की आर्थिक व्यवहारांची गडबड असते, मात्र यंदा याच काळात सणासुदीच्या सुट्ट्या आल्या आहेत.
रमजान ईदचा चंद्र दिसण्यावरून तारखांबाबत जरी संभ्रम असला, तरी रिझर्व्ह बँकेने RBI सुट्ट्यांचे वेळापत्रक स्पष्ट केले आहे. २० मार्चपासून सुरू होणारा हा सुट्ट्या ३१ मार्चपर्यंत अधूनमधून सुरू राहणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँकांचे शटर डाऊन असणार आहे.
२० आणि २१ मार्चला काय स्थिती?
२० मार्च (शुक्रवार): ईद-उल-फितर आणि जुमात-उल-विदा निमित्त श्रीनगर आणि आंध्र प्रदेशात बँका बंद राहतील. इतर राज्यांत कामकाज सुरू राहील.
advertisement
२१ मार्च (शनिवार): रमजान ईद आणि सरहुलनिमित्त महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील प्रमुख राज्यांत बँका बंद राहतील. विशेष म्हणजे, हा तिसरा शनिवार असल्याने बँका सुरू असणे अपेक्षित होते, पण ईदमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२२ मार्च: रविवार असल्याने देशभरातील बँका बंद.
२६ मार्च: रामनवमीनिमित्त मुंबई, नागपूर, पुणे यांसह प्रमुख शहरांतील बँका बंद.
advertisement
२७ मार्च: रामनवमीनिमित्त मुंबई, नागपूरसह काही राज्यांत पुन्हा सुट्टी असणार आहे.
३१ मार्च: महावीर जयंतीनिमित्त मुंबई, दिल्ली, नागपूरसह अनेक शहरांत बँकांचे कामकाज होणार नाही.
बँकांचे प्रत्यक्ष कामकाज बंद असले तरी, ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि एटीएम ATM सेवा २४ तास सुरू राहतील. मात्र, चेक क्लिअरन्स, रोख रक्कम जमा करणे किंवा खात्यातून मोठी रक्कम काढणे यांसारख्या कामांसाठी तुम्हाला बँकेच्या कामकाजाच्या दिवसाची वाट पाहावी लागेल. सलग सुट्ट्यांमुळे आणि आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकमध्ये देखील तुमची कामं रखडण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 2:30 PM IST









