सलग 4 दिवस बंद राहणार बँक, आताच नोट ठेवा तारीख, नाहीतर होईल मोठं नुकसान

Last Updated:

जानेवारी अखेरीस सलग सुट्ट्या आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या संपामुळे बँका २४ ते २७ जानेवारी बंद राहणार, रोख टंचाईची शक्यता, ऑनलाइन सेवा सुरू राहतील.

News18
News18
नव्या वर्षाची सुरुवात झाली खरी मात्र बँकेची कामं पहिल्याच महिन्यात अडकतात की काय असं झालं आहे. जानेवारी महिन्यात सण आणि प्रजासत्ताक दिनामुळे बँक बंद राहणार आहे. याशिवाय बँक कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संपावर जात आहेत. त्यामुळे जानेवारी अखेरीस तुमची कामं होणार नाहीत. त्यामुळे किती दिवस बँक बंद राहणार आणि तुमच्याकडे पैसेही काढून ठेवावे लागू शकतात ते सगळंच समजून घेऊया.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस बँकिंग व्यवहारांचे नियोजन करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी समोर येत आहे. जर तुमचे बँकेचे एखादे महत्त्वाचे काम असेल, तर ते आताच दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात उरकून घेतलेलं बरं, अन्यथा तुम्हाला थेट पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागू शकते. महिनाअखेरीस बँकांना सलग सुट्ट्यांचे आणि संपाचे ग्रहण लागणार असून, यामुळे सलग ४ दिवस बँकांचे टाळे उघडणार नाहीत.
advertisement
या गोंधळाचे मुख्य कारण म्हणजे सलग येणाऱ्या तीन सुट्ट्या आणि त्यानंतर बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेला देशव्यापी संप. २४ जानेवारीला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील, २५ जानेवारीला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. या तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर २७ जानेवारीला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. यामुळे सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहील, ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
advertisement
5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी
बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी करत आहेत. सध्या बँकांना फक्त दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते, पण आता सर्व शनिवार सुट्ट्या असाव्यात, असा कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे. याशिवाय वेतनवाढ आणि पेन्शनच्या मुद्द्यावर तोडगा न निघाल्याने संघटनांनी २७ जानेवारीला संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे. जर हा संप झाला, तर चेक क्लिअरन्सपासून ते रोख रक्कम काढण्यापर्यंत सर्वच व्यवहारांची साखळी विस्कळीत होईल.
advertisement
ATM मध्येही जाणवणार खडखडाट
या सलगच्या सुट्ट्यांमुळे सर्वात मोठी अडचण रोख रकमेची होऊ शकते. बँका सलग चार दिवस बंद राहिल्यामुळे शहरातील एटीएममधील रोकड संपण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत ऐनवेळी पैशांची नड भासल्यास नागरिकांची तारांबळ उडेल. तसेच व्यापाऱ्यांसाठी हा काळ कठीण असेल, कारण त्यांचे रोखीचे व्यवहार बँकांमध्ये जमा करता येणार नाहीत. ज्यांना तातडीने कर्ज हवे आहे किंवा इतर कागदोपत्री कामे करायची आहेत, त्यांनी २३ जानेवारीपूर्वीच आपले व्यवहार पूर्ण करावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
जरी बँकांचे प्रत्यक्ष कामकाज बंद असले, तरी नेट बँकिंग, युपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा सुरू राहतील. त्यामुळे शक्य तिथे ऑनलाइन व्यवहारांचा वापर करावा. मात्र, तरीही मोठ्या व्यवहारांसाठी आणि प्रत्यक्ष बँकेत जाव्या लागणाऱ्या कामांसाठी आतापासूनच नियोजन करणे शहाणपणाचे ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
सलग 4 दिवस बंद राहणार बँक, आताच नोट ठेवा तारीख, नाहीतर होईल मोठं नुकसान
Next Article
advertisement
Gold Price: ज्याची भीती होती तेच झालं, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर, बाजारात खळबळ
ज्याची भीती होती तेच झालं, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर, बाजारात खळबळ
  • सोन्याच्या दराने मागील काही दिवसांत चांगलीच उसळण घेतली होती.

  • काही दिवसांपूर्वीच सोन्याच्या दराने रेकॉर्ड ब्रेक दर गाठला होता.

  • सोन्याचे दर घसरतील असा होरा होता. मात्र, सोन्याच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला.

View All
advertisement