हॉटेलचा कर्मचारी आता झाला मालक, करतोय वर्षाला 10 ते 15 लाखांची कमाई, बीडच्या नामदेवची कहाणी Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
नामदेव सातपुते यांची कहाणी फार वेगळी आहे. त्यांनी एका हॉटेलवर तब्बल दहा वर्ष कामगार म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : दिवसेंदिवस हॉटेल व्यवसायामध्ये वाढ होत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून आजवर अनेकांनी स्वतःला भरपूर सक्षम बनवलेलं आहे. खरंतर हा व्यवसाय क्वालिटीवर निर्भर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जिथे क्वालिटी असते तिथं ग्राहकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद लाभतो. यामुळे हॉटेल व्यावसाकांमध्ये भरभराटीचे दिवस येऊ लागतात. आम्ही आपणास अशाच एका हॉटेल व्यावसायिकाची कहाणी सांगणार आहोत. बीड जिल्ह्यातील वडवणी या गावातील व्यावसायिकाचे नाव नामदेव सातपुते आहे. ते सध्याचा घडीला हॉटेल व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
नामदेव सातपुते यांची कहाणी फार वेगळी आहे. त्यांनी एका हॉटेलवर तब्बल दहा वर्ष कामगार म्हणून काम केलं. नंतर त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करावा. जेणेकरून आपल्याला आर्थिक हातभार लागेल आणि त्या माध्यमातून आपली प्रगती होईल. त्यांनी हॉटेल कामगारांचे काम सोडून वडवणीमध्ये एका ठिकाणी पुरी भाजीसाठी छोटसं हॉटेल चालू केलं. कमीत कमी दरामध्ये त्यांनी पुरी भाजीचा व्यवसाय चालू केला होता. हळूहळू त्यांना ग्राहकाचा चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांनी व्यवसायामध्ये वाढ करण्यास सुरुवात केली.
advertisement
जशी जशी व्यवसायामध्ये त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांना काही अडचणींना देखील तोंड द्यावं लागलं. कारण काही वेळा व्यवसायामध्ये कमतरता आल्यास त्यांना आर्थिक दृष्ट्या काही गोष्टींना समोर जावं लागायचं. परंतु त्यानंतर त्यांची व्यवसायामध्ये एक वेगळी वाटचाल निर्माण होऊ लागली. सध्या स्थिती पाहता वडवणी येथे त्यांच्या हॉटेल मल्हार या व्हेज हॉटेलला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो.
advertisement
खास करून इथं लोक दूरवरुन घेतल्या पुरी भाजीची चव चाखण्यासाठी येतात. खरंतर सुरुवातीला या व्यवसायिकाच्या हातामध्ये कुठलही काम नव्हतं. म्हणून त्यांनी एका हॉटेलवर कामगार म्हणून काम करण्याचं ठरवलं होतं. परंतु तिथं पुरेसे काही पैसे मिळत नसल्याने त्यांना स्वतःचं काहीतरी चालू करावसं वाटलं. सद्यस्थिती पाहता नामदेव सातपुते हे हॉटेल या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला कमीत कमी 10 ते 15 लाखांचा नफा कमवतात.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
December 02, 2024 5:03 PM IST
मराठी बातम्या/मनी/
हॉटेलचा कर्मचारी आता झाला मालक, करतोय वर्षाला 10 ते 15 लाखांची कमाई, बीडच्या नामदेवची कहाणी Video

