पुणेकर मंदाआजी, वयाच्या 65 वर्षी चालवताय मटकी भेळचा गाडा, चव अशी की परत याल! Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यात राहणाऱ्या मंदा आजी यांच्या गेले तीन पिढ्या भेळीचा व्यवसाय करत आहेत. या ठिकाणी मंदा आजीच्या हातची भेळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : अनेक पिढी परंपरेने चालत आलेले व्यवसाय आपण पाहिले असतील. त्याचप्रमाणे पुण्यात राहणाऱ्या मंदा आजी यांच्या गेले तीन पिढ्या भेळीचा व्यवसाय करत आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोड येथे त्यांचा भेळीचा गाडा असून गेली 70 वर्ष झालं त्यांचा कुटंबीयांचा व्यवसाय सुरु आहे. या ठिकाणी मंदा आजीच्या हातची भेळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते.
advertisement
आनंद मटकी भेळ नावाने गाडा असून मंदा आजीच वय हे 65 वर्ष आहे. त्यांच्या हातची ओली मटकी भेळ काही वेगळीच असून लोक आवर्जून ती खाण्यासाठी येत असतात. तर या सोबत ओली आणि सुकी अशी भेळ ही बनवतात. येणारे जाणारे देखील आजीकडे कौतुकाने बघत असतात.
advertisement
पूर्वी माझे सासरे शेंगा भाजणे, सरबत बनवण्याच काम करत होते. त्यानंतर हळू हळू मग भेळ बनवायला सुरुवात केली. गेली 30 वर्ष झालं मी भेळ बनवत आहे. मटकी चिवडा भेळ ही आमची स्पेशालिटी असून लोकांना ती खूप आवडते. तर ही भेळ दगडी पोहे, चिवडा, मटकी, कांदा, चटणी, लिंबू टाकून ही बनवली जाते. सुरुवात केली तेव्हा भेळची 8 किंमत रुपये होती. आता ती भेळ 50 रुपयाला मिळत आहे. यासोबतच मटकी भेळ, ओली भेळ, शेवपुरी, पाणीपुरी देखील तयार केली जाते. लोकांचा चांगला प्रतिसाद असतो. लांबून लोक ही भेळ खाण्यासाठी येतात. त्यामुळे छान वाटतं, अशा भावना मंदा कबाडे या आजीने व्यक्त केल्या आहेत.
advertisement
मंदा आजीचे वय 65 असून देखील त्या हे भेळीचा व्यवसाय अगदी आनंदाने करत असतात. तर त्यांना त्यांच्या कामात त्यांचे नातू देखील मदत करत असतात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 02, 2024 2:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पुणेकर मंदाआजी, वयाच्या 65 वर्षी चालवताय मटकी भेळचा गाडा, चव अशी की परत याल! Video

