Budget 2026: अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, तुमच्या खिशावर थेट परिणाम, काय स्वस्त, काय महाग? पाहा संपूर्ण यादी....
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. मोबाईल, १७ प्रकारची औषधं आणि लेदर वस्तू स्वस्त झाल्या आहेत, तर दारू आणि आयात केलेल्या वस्तू महागल्या आहेत. पाहा स्वस्त आणि महाग झालेल्या वस्तूंची संपूर्ण यादी एका क्लिकवर
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर केला. निर्मला सीतारमन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या. मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. सीतारमण यांनी अनेक वस्तूंवरील सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली, म्हणजेच त्या सर्व स्वस्त होतील. अर्थसंकल्पीय घोषणांनंतर काही वस्तू स्वस्त होणार असून काही गोष्टी महाग होणार आहेत.
आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारतासाठी आहे. १२ वर्षांपासून नियोजनबद्ध कारभार सुरू आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढत आहे. लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम सुरू आहे. दारिद्र्य कमी करण्यावर यशस्वी ठरत आहोत.
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, विशेषतः भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवरील सीमाशुल्क कमी केले जात आहे. काही वस्तूंचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, चामडे आणि कापडांची निर्यात देखील शुल्कमुक्त असेल. या वस्तूंवरील सीमाशुल्क कमी केले जात आहे. संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ केले जातील. क्रीडा साहित्य आणि खेळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
advertisement
>>> स्वस्त काय, महाग काय?
>> स्वस्त
- चामड्याच्या वस्तू
- सिंथेटिक पादत्राणे
- लेदर उत्पादने
- १७ कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे शुल्कमुक्त
- लिथियम-आयन पेशी
- मोबाइल बॅटरी स्वस्त होतील
- सोलार ग्लास (सौर पॅनेल काच) स्वस्त होतील
- मिश्र वायू (सीएनजी)
- ईव्ही
- मायक्रोवेव्ह ओव्हन
- परदेश प्रवास
advertisement
> कोणत्या वस्तू होणार महाग?
आयात शुल्कात वाढ केल्याने काही गोष्टी महाग होणार आहेत. यामध्ये मद्य, भंगार, खनिजं या गोष्टीदेखील महाग होणार आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Feb 01, 2026 12:48 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Budget 2026: अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, तुमच्या खिशावर थेट परिणाम, काय स्वस्त, काय महाग? पाहा संपूर्ण यादी....









