Budget 2026: 1 फेब्रुवारी रविवार.... मग कधी सादर होणार बजेट?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
केंद्र सरकार १ फेब्रुवारी २०२६ रोजीच अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असून, रविवार असूनही तारीख बदलण्याचे संकेत नाहीत. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा.
नवीन वर्ष म्हटल्यावर प्रत्येकाला सगळ्यांना आशा असते ती बजेट 2025 ची. नव्या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना काय मिळणार? त्यांच्या फायद्याचं काय असणार याची लगबग सुरू होते. यावेळी मात्र रविवार आला आहे. त्यामुळे बजेट सादर होणार का? की पुढे जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
केंद्र सरकार सध्या २०२६ च्या अर्थसंकल्पाच्या तयारीला वेग देत असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ रोजीच अर्थसंकल्प सादर करण्याचे सरकारचे नियोजन आहे. विशेष म्हणजे या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असूनही अर्थसंकल्पाच्या तारखेत कोणताही बदल करण्याचे संकेत सध्या तरी दिसत नाहीत. या महत्त्वाच्या निर्णयामुळे अर्थ मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी आता युद्धपातळीवर काम करत आहेत, जेणेकरून परंपरा जपली जाईल आणि अर्थसंकल्प वेळेत संसदेत मांडता येईल.
advertisement
अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष
जरी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित मानली जात असली, तरी अद्याप केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांबाबत अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही. संसदेचे अधिवेशन कधी सुरू होईल आणि ते किती दिवस चालेल, याची स्पष्टता लवकरच मिळेल. गुंतवणूकदार, शेअर बाजारातील जाणकार आणि सामान्य जनता या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहे.
advertisement
तयारी अंतिम टप्प्यात
अर्थ मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव, वित्तीय आकडेवारी आणि नवीन प्रस्तावांना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. १ फेब्रुवारीला कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय अर्थसंकल्प सादर करता यावा, यासाठी ड्राफ्टिंगची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. सरकारचे संपूर्ण लक्ष ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यावर आहे.
१ फेब्रुवारीची तारीख का महत्त्वाची?
अर्थसंकल्पाची तारीख केवळ सरकारसाठी नाही, तर उद्योग जगत आणि सामान्य माणसासाठीही अत्यंत महत्त्वाची असते. १ फेब्रुवारीला बजेट मांडल्यामुळे नवीन आर्थिक वर्ष (१ एप्रिल) सुरू होण्यापूर्वी सरकारला धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. जर या तारखेत बदल झाला, तर त्याचा परिणाम बाजारातील नियोजन आणि संसदीय चर्चांवर होऊ शकतो.
advertisement
थोडक्यात सांगायचे तर, रविवार असला तरी सरकार आपली परंपरा मोडण्याच्या मनस्थितीत नाही. जोपर्यंत अधिकृत पत्रक येत नाही, तोपर्यंत १ फेब्रुवारी २०२६ हीच अर्थसंकल्पाची फायनल तारीख मानली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 2:45 PM IST











