Business Idea: भांडवल कमी अन् फायद्याची हमी, 250 चं कानातलं फक्त 70 रुपयांना, मुंबईत इथं करा होलसेल दरात खरेदी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Business Idea: श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव असतात. या काळात तुम्ही स्वत:चा कानातल्यांचा बिझनेस करू शकता. मुंबईतील होलसेल मार्केटमध्ये 15 रुपयांपासून खरेदी करता येते.
मुंबई : श्रावण हा सण-समारंभांचा महिना असून या महिन्यात मंगळागौर, रक्षाबंधन, गणपती उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे या निमित्ताने महिला विविध दागदागिने आणि पारंपरिक वस्त्रांमध्ये सजतात. या निमित्ताने जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर स्त्रियांसाठी ज्वेलरीचा व्यवसाय हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेषतः कानातल्यांचा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि नफा मिळवण्यासाठीही हा एक चांगला मार्ग आहे.
मुंबईतील प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमध्ये तुम्हाला फक्त 15 रुपयांपासून कानातले होलसेल दरात खरेदी करता येतात. ‘मजेशा बँगल्स’ हे दुकान कबूतर खाण्याजवळ आहे, जिथे तुम्हाला विविध प्रकारचे कानातले स्वस्तात मिळतात. रोजच्या वापरासाठी साधे कानातले असो किंवा थोडे झगमगीत, मोठ्या डिझाइन्सचे कानातले असो, इथे सर्व काही उपलब्ध आहे.
advertisement
या दुकानात तुम्हाला मोरपंख, स्टोन, डायमंड, ऑक्साईड अशा प्रकारांमध्ये आकर्षक कानातले मिळतील. बाजारात आणि ऑनलाईन 200 ते 250 रुपयांना मिळणारे कानातले इथे फक्त 70 ते 80 रुपयांमध्ये मिळतात. सोशल मीडियावर अनेक कलाकार ज्या प्रकारची ज्वेलरी वापरतात, तसे डिझाइन्स इथे फक्त 90 रुपयांपासून मिळतात.
तुम्ही हे कानातले स्थानिक बाजारपेठेत विकू शकता किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन विक्रीही सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीत सुरू होणारा हा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. त्यामुळे या श्रावणात महिलांच्या सौंदर्याची शोभा वाढवणारे कानातले विकून स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि आर्थिक स्वावलंबनाकडे पहिले पाऊल टाका!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 26, 2025 9:08 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Idea: भांडवल कमी अन् फायद्याची हमी, 250 चं कानातलं फक्त 70 रुपयांना, मुंबईत इथं करा होलसेल दरात खरेदी

