चांगला पगार तरी होत नाही सेव्हिंग, याचा अर्थ तुम्ही अडकलाय Debt Trap मध्ये; कंगाल होण्याआधी हे वाचा, एक चूक संकटात टाकू शकते

Last Updated:

Debt Trap: EMI, क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनच्या वाढत्या वापरामुळे अनेक जण नकळत कर्जाच्या सापळ्यात अडकत आहेत. डिफॉल्टचे वाढते आकडे आणि काही ठराविक लक्षणे आर्थिक धोका वाढत असल्याचा इशारा देत आहेत.

News18
News18
डेट ट्रॅप म्हणजेच कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. यामागे ईएमआयवर वाढलेली खरेदी हे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक लोक बँक खात्यात पुरेसे पैसे नसतानाही वस्तू ईएमआयवर खरेदी करत आहेत. यामध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती साहित्य यांचा मोठा समावेश असतो. याशिवाय, क्रेडिट कार्डवर जास्त रकमेची खरेदी केल्यानंतर ती परतफेड करणे अनेकांसाठी अडचणीचे ठरत आहे. पर्सनल लोन घेतल्यामुळेही व्यक्ती कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा धोका वाढतो.
advertisement
क्रेडिट कार्डवरील थकबाकी न भरल्यामुळे डिफॉल्ट होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मार्च २०२४ मध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त काळ थकबाकी असलेल्या क्रेडिट कार्ड बकायांवरील डिफॉल्ट दर १२.५ टक्के होता. तोच दर मार्च २०२५ मध्ये वाढून १५ टक्के झाला आहे. ही माहिती क्रिफ हायमार्क (CRIF High Mark) च्या आकडेवारीवर आधारित आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की क्रेडिट कार्डचा वापर करणे चुकीचे नाही, मात्र आपल्या बिल भरण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वापर केल्यास ग्राहक अडचणीत येऊ शकतो.
advertisement
वाचा- पुण्यात घर खरेदी करण्याचे Best Time, मुंबईची काय परिस्थिती? नवे आकडे तुम्हाला...
एखादी व्यक्ती डेट ट्रॅपमध्ये अडकत असताना त्याची काही लक्षणे दिसू लागतात. मात्र बहुतेक वेळा त्या व्यक्तीला सुरुवातीला याची जाणीव होत नाही. जेव्हा ती व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात खूप आतपर्यंत अडकते, तेव्हाच तिला परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते. मनीकंट्रोलने डेट ट्रॅपमध्ये अडकण्याची पाच मोठी लक्षणे सांगितली आहेत.
advertisement
पहिले लक्षण म्हणजे, व्यक्ती क्रेडिट कार्ड बिल किंवा लोनचा फक्त मिनिमम अमाउंट भरू लागते. मिनिमम अमाउंट भरल्यामुळे दंड किंवा लेट फीपासून वाचता येते, पण त्यामुळे मूळ कर्जाची रक्कम म्हणजेच प्रिंसिपल कमी होत नाही. परिणामी व्याज वाढतच राहते. अनेक वेळा व्याजाची रक्कम मूळ कर्जापेक्षा जास्त होते.
advertisement
दुसरे लक्षण म्हणजे, जुने कर्ज फेडण्यासाठी नवे कर्ज घ्यावे लागणे. कर्जाच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती अनेकदा जुन्या लोनची ईएमआय भरण्यासाठी नवीन लोन घेते. त्यामुळे ती व्यक्ती अधिक खोल कर्जात अडकते. सुरुवातीला याचा फारसा त्रास जाणवत नाही, पण जसजशी ईएमआयची रक्कम वाढते, तसतसा उत्पन्न आणि खर्च यामधील फरक मोठा होत जातो.
advertisement
तिसरे लक्षण म्हणजे, नियमित पेमेंट करूनही कर्जाची रक्कम कमी न होणे. व्यक्ती वेळेवर हप्ते भरत असते, पण तरीही लोनचा बॅलन्स तसाच राहतो. याचे कारण म्हणजे भरलेली रक्कम मोठ्या प्रमाणात व्याजात जाते आणि प्रिंसिपलमध्ये फारशी कपात होत नाही.
वाचा- 8व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; पगार कधी अन् किती वाढणार? या तारखेपासून एरियर मिळणार
चौथे लक्षण म्हणजे, उत्पन्नाचा मोठा भाग ईएमआयमध्ये खर्च होणे. जर एखाद्या व्यक्तीच्या मासिक उत्पन्नाचा मोठा हिस्सा ईएमआय भरण्यात जात असेल, तर ती बाब चिंतेची आहे. यामुळे बचत आणि गुंतवणुकीसाठी पैसे उरत नाहीत आणि आर्थिक नियोजन कोलमडते.
advertisement
पाचवे लक्षण म्हणजे, अनेक वर्षे नोकरी करूनही बचत न होणे. डेट ट्रॅपमध्ये अडकलेल्या अनेक लोकांकडे अनेक वर्षांची नोकरी असूनही फारशी बचत नसते. हे याचे स्पष्ट संकेत आहेत की ती व्यक्ती दीर्घकाळ कर्ज फेडण्यातच अडकलेली राहिली आहे. त्यामुळे तिला ना पुरेशी बचत करता आली, ना गुंतवणूक करता आली.
view comments
मराठी बातम्या/मनी/
चांगला पगार तरी होत नाही सेव्हिंग, याचा अर्थ तुम्ही अडकलाय Debt Trap मध्ये; कंगाल होण्याआधी हे वाचा, एक चूक संकटात टाकू शकते
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement