एक छोटी चूक आणि अर्ज बाद, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, कसं करायचं E-KYC?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी E KYC अनिवार्य, चुकीची माहिती दिल्यास नाव बाद होईल. महाराष्ट्रात 26 लाख लाभार्थी अपात्र, दर महिन्याला 1500 रुपये मिळतात.
लाडकी बहीण योजनेत आता E KYC करावं लागणार अशी माहिती समोर आली आहे. फसवणूक आणि लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना यातून बाद करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 26 लाख हून अधिक लाभार्थी अपात्र आढळल्याने आता पुन्हा एकदा E KYC करावं लागणार आहे. हे करत असताना जर तुमच्याकडून माहिती चुकीची गेली तर मात्र तुमचंही नाव या यादीमधून बाद केलं जाऊ शकतं.
या चुका होऊ नयेत यासाठी तुम्ही काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला वेबसाईटवर लॉगइन करावं लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर लॉग इन पर्याय निवडायचा. तिथे E KYC पर्याय हटवण्यात आला होता. तो पुन्हा सुरू केला आहे की नाही ते तपासायचं. जर हा पर्याय वेबसाइटवर दिसत असेल तर तुम्ही E KYC करु शकता. जर तुम्हाला दिसत नसेल तर चिंता करू नका, लवकरच हा पर्याय सरकारकडून वेबसाइटवर उपलब्ध करुन दिला जाईल.
advertisement
लाभार्थी महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी ही योजना आहे. दर महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर येतात. ज्या महिला दिलेल्या वेळेत E KYC करणार नाहीत त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे. महाराष्ट्रात आधीच लाडकी बहीण योजनेत घोटाळे झाले आहेत. 14 हजार लाडक्या भावांनी बहिणींच्या नावाने पैसे लाटले होते. तर ९ हजारहून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींच्या नावे पैसे लाटले होते.
advertisement
लाडक्या बहिणीसाठी काय आहेत पात्रतेच्या अटी
महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा
विधवा, विवाहिक, घटस्फोटीत,
वयमर्यादा किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असायला हवी
घरात एखादी अविवाहित महिला असल्यास तीही अर्ज करू शकते.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न- कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न2.50 लाखा रुपयांपेक्षा जास्त नसावं
बँक खाते आणि आधार लिंक- महिलेकडे स्वतःच्या नावावर बँक खाता असावा जो आधार कार्डाशी लिंक्ड असावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 12:30 PM IST


