Education लोन घेताना करु नका ही चूक! अन्यथा होईल दुप्पट नुकसान
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या काळात बहुतांश विद्यार्थी हे शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतात. पण एज्युकेशन लोन घेतल्यावर कोणत्या चुका केल्यास नुकसान होऊ शकते हे आपण जाणून घेऊया.
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट: सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टी प्रमाणेच मुलांचे शिक्षणही खूप महाग झाले. महागाई दरम्यान आई-वडीलांच्या उत्पन्नातून मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळणं शक्य नाहीये. अशा वेळी लोक आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोनची मदत घेतात. एज्युकेशन लोनच्या मदतीने अनेक मुलं देशातील मोठ्या संस्थानांमध्ये अॅडमिशन घेतात किंवा विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात. पण अनेकदा एज्युकेशन लोन फेडताना चूक होते आणि मोठं नुकसान झेलावं लागतं.
तज्ज्ञांच्या मते, इतर कर्जांप्रमाणेच शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी तुमचे आर्थिक नियोजन मजबूत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या कर्जाची परतफेड करण्यात चूक केली तर तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो. एज्युकेशन लोनसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते आपण जाणून घेऊया.
advertisement
फायनेंशियल हेल्थवर इतर लोन सारखाच परिणाम
एज्युकेशन लोन हे उर्वरित कर्जाप्रमाणेच आहे. परंतु त्याच्या परतफेडीचे वेळापत्रक थोडे वेगळे आहे. साधारणपणे, एज्युकेशन कर्ज घेतल्यावर, तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी कोर्स पूर्ण झाल्यानंतर 6-12 महिन्यांचा कालावधी दिला जातो. यावेळी, बहुतेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळते, ज्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे सोपे होते. मात्र, एज्युकेशन लोन डिफॉल्ट केल्याने तुमच्या आर्थिक आरोग्यावर इतर कर्जांप्रमाणेच वाईट परिणाम होतो.
advertisement
सिक्योर्ड लोन डिफॉल्ट झाल्यास मोठं नुकसान
एखाद्याने मौल्यवान मालमत्ता गहाण ठेवून सिक्योर्ड एज्युकेशन लोन घेतले तर त्याला कधीही डिफॉल्ट होऊ देऊ नये. तुमचे सिक्योर्ड लोन डिफॉल्ट झाल्यास तुम्हाला सुरक्षितता म्हणून ठेवलेल्या मौल्यवान वस्तू गमवाव्या लागतील. तुम्ही EMI न भरल्यास तुमचे कर्ज NPA म्हणून घोषित केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत सुरक्षा म्हणून ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार बँकेला मिळतो.
advertisement
क्रेडिट स्कोर खराब असू शकतो
view commentsएज्युकेशन लोन घेतल्यानंतर तुम्ही ईएमआयची परतफेड करू शकत नसाल, तर कर्जदार तुम्हाला त्यासाठी नोटीस देऊ शकतो. जर तुम्ही निर्धारित कालावधीत कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर बँक तुम्हाला डिफॉल्टर मानू शकते आणि क्रेडिट ब्युरोकडे तक्रार करू शकते. तुम्हाला डिफॉल्टर घोषित केले गेले तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात नवीन कर्ज घेणे कठीण होईल. हे टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला परतफेड करण्यात कोणतीही चूक करू नये आणि वेळेवर EMI भरावेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 07, 2023 4:37 PM IST









