तुमच्या कपाटात तर नाही ना बँकेचा पैसा, असेल तर आताच परत करा; नाहीतर अडचणीत याल, 5669 कोटी अजूनही गायब

Last Updated:

Latest Data Notes: रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा चलनातून बाद करून अडीच वर्षे उलटली तरी हजारो कोटी रुपयांच्या नोटा अजूनही बँकिंग प्रणालीबाहेरच आहेत. आरबीआयच्या ताज्या आकड्यांमुळे या नोटांच्या संथ परतफेडीवर आणि लोकांच्या उदासीनतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

News18
News18
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने 2023 मध्ये चलनातून बाद केलेल्या 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांची संपूर्ण परतफेड अद्याप पूर्ण झालेली नाही. 2025 च्या अखेरपर्यंतचे ताजे आकडे समोर आले असून, अजूनही 5 हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा परत येणे बाकी असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. म्हणजेच इतकी मोठी रक्कम असलेल्या नोटा अजूनही लोकांकडेच अडकून पडल्या आहेत. विशेष म्हणजे, नोटा जमा करण्याच्या सुविधा सुरू असतानाही त्यांचा परतावा आता फारच संथ गतीने होत आहे.
advertisement
आतापर्यंत 98.41 टक्के नोटा परत
आरबीआयच्या माहितीनुसार, 19 मे 2023 रोजी चलनातून काढून टाकलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची एकूण किंमत त्या वेळी 3.56 लाख कोटी रुपये इतकी होती. 31 डिसेंबर 2025 पर्यंत यापैकी 98.41 टक्के नोटा परत जमा झाल्या आहेत. मात्र अजूनही 5,669 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे आहेत आणि त्या बँकिंग प्रणालीत परत आलेल्या नाहीत.
advertisement
दोन महिन्यांत फक्त 148 कोटींची परतफेड
सुरुवातीच्या टप्प्यात या नोटांची परतफेड वेगाने झाली होती. बँकांमध्ये जमा करण्याची मुभा दिल्यानंतर अनेकांनी त्वरित नोटा परत केल्या. पण आता ही प्रक्रिया जवळपास थंडावल्याचे चित्र आहे. आकडे पाहिले तर 31 ऑक्टोबरला बाजारात 5,817 कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा होत्या. दोन महिन्यांत म्हणजे डिसेंबरअखेरपर्यंत फक्त 148 कोटी रुपयांच्या नोटाच परत आल्या. आरबीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, संपूर्ण परतफेड होईपर्यंत या नोटा कायदेशीर चलन (लीगल टेंडर) म्हणून वैध राहतील.
advertisement
2000 रुपयांच्या नोटा का बंद केल्या?
2000 रुपयांची नोट पहिल्यांदा नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आणली गेली होती. त्या वेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती आणि नोटबंदीचा परिणाम कमी करण्यासाठी मोठ्या मूल्याची ही नोट जारी करण्यात आली. पुढे इतर मूल्यवर्गाच्या नोटांचा पुरवठा पुरेसा झाल्यानंतर, आरबीआयनेक्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत 19 मे 2023 रोजी या गुलाबी नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला.
advertisement
अजूनही इथे बदलता येतात 2000 रुपयांच्या नोटा
चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर, 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व बँकांच्या शाखांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा होती. त्यानंतर नोटांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यावर ही प्रक्रिया फक्त आरबीआयच्या 19 कार्यालयांपुरती मर्यादित करण्यात आली. सध्या अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपूरम या आरबीआय कार्यालयांत 2000 रुपयांच्या नोटा अजूनही बदलता येतात.
advertisement
इतकेच नव्हे तर लोकांच्या सोयीसाठी इंडिया पोस्टच्या माध्यमातून, कोणत्याही पोस्ट ऑफिसद्वारे 2000 रुपयांच्या नोटा आरबीआयकडे पाठवण्याची सुविधाही सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुमच्या कपाटात तर नाही ना बँकेचा पैसा, असेल तर आताच परत करा; नाहीतर अडचणीत याल, 5669 कोटी अजूनही गायब
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement