गुंतवणूकदार हादरले, 231 कोटींचा स्कॅम; घोटाळा कसा केला? डोकं चक्रावून टाकणारा प्रकार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gameskraft Technologies Limited ने माजी CFO विरोधात 231 कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार बेंगळूरु पोलिसांत दाखल केली असून कंपनीच्या नफ्यात मोठी घट झाली आहे.
बेंगळूरु: आघाडीची ऑनलाईन गेमिंग कंपनी 'गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड'ने आपल्या माजी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) विरोधात २३१ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या गैरव्यवहारासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घोटाळ्यामुळे कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२५ च्या निव्वळ नफ्यात मोठी घट झाली आहे.
advertisement
गेम्सक्राफ्टने शुक्रवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) मध्ये कंपनीने ४,०९० कोटी रुपयांच्या महसुलावर ७०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) कंपनीला ३,४७५ कोटी रुपयांच्या महसुलावर ९४७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या वर्षातील नफ्यातील घट सुमारे २३१ कोटी रुपयांच्या एका मोठ्या गैरव्यवहारामुळे झाली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
advertisement
गैरव्यवहाराचे स्वरूप
कंपनीने या व्यवहाराच्या स्वरूपाबद्दल अधिक तपशील दिला नसला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा गैरव्यवहार कंपनीच्या माजी CFO ने केलेल्या पैशांच्या गैरवापराशी संबंधित आहे. मे महिन्यातच या अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून हटवण्यात आले होते. त्याच्या विरोधात बेंगळूरु येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
advertisement
तक्रारीनुसार या माजी CFO ने गेल्या काही वर्षांत एकूण २३१.३९ कोटी रुपयांचे अनधिकृत आर्थिक व्यवहार केले. याच वर्षी मार्चमध्ये त्याने कंपनीला ईमेल पाठवून वैयक्तिक शेअर आणि 'फ्यूचर अँड ऑप्शन' (F&O) व्यापारासाठी कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याची कबुली दिली होती.
advertisement
पैसे कसे हडपले?
कंपनीच्या सूत्रांनुसार आरोपी अधिकारी मार्च महिन्यापासून फरार आहे. त्याने नफ्याची रक्कम बुडीत कर्ज (फंसे हुए कर्ज) असल्याचे भासवले आणि ती ‘राईट ऑफ’ केली. म्हणजेच, ही रक्कम आता वसूल होणार नाही असे दाखवून त्याने ती कंपनीच्या खात्यातून काढून घेतली. प्रत्यक्षात, त्याने ही सर्व रक्कम आपल्या वैयक्तिक खात्यात वळवली आणि कंपनीला २३१ कोटी रुपयांचा चुना लावला.
advertisement
या गैरव्यवहाराचा शोध लागल्यानंतर कंपनीने फॉरेन्सिक ऑडिट केले. त्यामध्ये किती आणि कोणत्या प्रकारे पैसे हडपले गेले हे समोर आले. कंपनी आरोपीकडून पैसे वसूल करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, मात्र आरोपीला अटक होईपर्यंत हे काम अवघड आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 10:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
गुंतवणूकदार हादरले, 231 कोटींचा स्कॅम; घोटाळा कसा केला? डोकं चक्रावून टाकणारा प्रकार