'माझ्या जीवावर जगते...', भर बाजारात पतीचं भयानक कृत्य, पत्नीचा ऑन द स्पॉट मृत्यू
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भर बाजारामध्ये पतीने पत्नीसोबत भयानक कृत्य केलं आहे, यानंतर पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
Crime : पतीने भर चौकात पत्नीला पिस्तुलाने गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीने केलेल्या या गोळीबारामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे. पत्नीला मारल्याचा आपल्याला कोणताही पश्चात्ताप झाला नाही, असं पतीने पोलिसांसमोर कबूल केलं आहे. पत्नी माझ्या पैशावर जगत होती आणि माझे सगळे पैसे संपवत होती, असंही पतीने पोलिसांना सांगितलं आहे.
विश्वकर्मा चौहान नावाच्या आरोपीने बुधवारी संध्याकाळी बाजारामध्ये गर्दीच्या वेळी पत्नी ममता चौहान हिची गोळ्या झाडून हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जोडपे एका फोटो स्टुडिओबाहेर वाद घालत असल्याचं दिसून आलं, त्यानंतर विश्वकर्माने पिस्तूल काढून दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी ममताच्या छातीत लागली आणि दुसरी तिच्या हातात घुसली. गोळीबारानंतर ममता जागीच कोसळली, यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
advertisement
गोळीबारानंतर पोलिसांनी विश्वकर्मा चौहानला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक बेकायदेशीर पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन रिकामे गोळे जप्त करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विश्वकर्मा याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरखपूरमध्ये भर बाजारात गर्दीच्या वेळी घडलेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ माजली.
ममता आणि विश्वकर्मा यांचं लग्न 14 वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. ममता ही खासगी कंपनीमध्ये काम करत होती. तसंच घटस्फोटानंतर मुलीच्या पालनपोषणासाठी तिने शेतजमिनीच्या हस्तांतरणाची मागणी केली होती. विश्वकर्मा आणि ममताला 13 वर्षांची मुलगी आहे, जी ममतासोबत भाड्याच्या घरात राहते.
Location :
Gorakhpur,Uttar Pradesh
First Published :
September 05, 2025 10:26 PM IST