Gold Silver Price Today: गौरी पूजनापूर्वी सोन्याने मोडला विक्रम, फक्त 1 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके रुपये

Last Updated:

Gold Silver Price Today: गौरी पूजनादिवशी सोन्याचे दर विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 7 हजार 822 रुपये प्रति तोळा झाला आहे. व्यापारी ललित मेहता यांनी वाढीची शक्यता वर्तवली.

News18
News18
Gold Silver Price Today: पाच दिवसांचे गणपती गावाला गेले, अन् गौरीचं आगमन सोनपावलांनी झालं. आज गौराईचं पूजन आहे. गौरी पूजनादिवशी पती-पत्नी सोनं खरेदी करतात. हा दिवस सुवर्णखरेदीसाठी चांगला मानला जातो. पती आपल्या पत्नीला ओवसा केल्यानंतर दागिना देतो. त्यामुळे यादिवशी पत्नी आपली हौस नवऱ्याकडून पूर्ण करून घेत असतात. मात्र या गौरीपूजनाला पती-पत्नीच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
गौरी पूजनादिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 1 लाख 7 हजार 627 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. 999 शुद्ध सोन्याचे दर 1 लाख 6 हजार 619 रुपये आहेत. तर GST सह हेच दर 1 लाख 7 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. 23 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 1 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दराने हा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणं आता सोपं नाही.
advertisement
24 कॅरेट एक ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 10 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 9 हजार 700 रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. 24 तासात सोन्याचे दर 1 हजार 800 रुपयांच्या आसपास वाढले आहेत. एक किलो 999 शुद्ध सोन्याचे दर 1 लाख 27 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर GST सह हे दर 1 लाख 28 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.
advertisement
सोन्याचे दर कसे आहेत?
24 कॅरेट सोन्याचे दर - 106740 रुपये प्रति तोळा
23 कॅरेट सोन्याचे दर- 102281 रुपये प्रति तोळा
22 कॅरेट सोन्याचे दर- 97814 रुपये प्रति तोळा
20 कॅरेट सोन्याचे दर- 88929 रुपये प्रति तोळा
18 कॅरेट सोन्याचे दर- 80085 रुपये प्रति तोळा
14 कॅरेट सोन्याचे दर- 62286 रुपये प्रति तोळा
advertisement
GST सह सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर - 107822 रुपये प्रति तोळा
23 कॅरेट सोन्याचे दर- 103360 रुपये प्रति तोळा
22 कॅरेट सोन्याचे दर- 98863 रुपये प्रति तोळा
20 कॅरेट सोन्याचे दर- 89873 रुपये प्रति तोळा
18 कॅरेट सोन्याचे दर- 80882 रुपये प्रति तोळा
14 कॅरेट सोन्याचे दर- 62897 रुपये प्रति तोळा
advertisement
सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. हा भाव 1 लाख 10 हजारापर्यंत येत्या काळात जाऊ शकतो, असे व्यापारी ललित मेहता यांनी सांगितले आहे. सध्या सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता, अमेरिकेने लादलेला अतिरिक्त कर, ढासळत चाललेला शेअर बाजार, आणि जगभरातील युद्धजन्य परिस्थिती यांचा मोठा प्रभाव आहे.
advertisement
या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत, आणि त्यासाठी सोन्यात गुंतवणूक वाढवली जात आहे. ही वाढती मागणी थेट सोन्याच्या किमतींवर परिणाम करत आहे. सोन्याचे दर दररोज ठरवले जातात आणि त्यावर अनेक घटक परिणाम करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी-विक्री होते. त्यामुळे डॉलरच्या बदलत्या किमतीचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या भावावर होतो.
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price Today: गौरी पूजनापूर्वी सोन्याने मोडला विक्रम, फक्त 1 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके रुपये
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement