Investment : सोनं, ETF की गोल्ड बाँड, चांगल्या रिटर्न्ससाठी कशात करायची गुंतवणूक? असं आहे गणित
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
गुंतवणूक म्हटलं, की सोन्याची खरेदी असा बहुसंख्य भारतीयांचा आजही पक्का विश्वास आहे. सोन्यात गुंतवलेले पैसे कधीही वाया जात नाहीत. त्यामुळे सोनं घ्या आणि निश्चिंत व्हा, असा एक सर्वसाधारण समज असतो.
मुंबई : गुंतवणूक म्हटलं, की सोन्याची खरेदी असा बहुसंख्य भारतीयांचा आजही पक्का विश्वास आहे. सोन्यात गुंतवलेले पैसे कधीही वाया जात नाहीत. त्यामुळे सोनं घ्या आणि निश्चिंत व्हा, असा एक सर्वसाधारण समज असतो; मात्र नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चं बजेट मांडलं. त्यात त्यांनी केलेल्या एका घोषणेमुळे सोन्याच्या किमतीत चांगलीच पडझड झाली आहे. त्यामुळे आपले पैसे सोन्यात गुंतवावेत, ईटीएफमध्ये की गोल्ड बाँडमध्ये असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे.
भारतात बहुतांश जण सोनं हा संकटकाळात धावून येणारा मित्र असल्याचं मानतात. बाजारात तेजी असो की मंदी, सोनं नेहमी मदतीला धावून येतं असा त्यांचा विचार असतो. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या किमती चांगल्याच वाढल्या होत्या; मात्र नुकत्याच सादर झालेल्या बजेटमध्ये सरकारने सोन्यावरचं सीमा शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत खाली आणलं आहे. भारतात सोनं उत्पादन होत नाही. त्यामुळे भारतातली सोन्याची बाजारपेठ ही पूर्णपणे आयातीवर चालणारी आहे. त्यामुळे आता दर पडलेले असताना सोनं, ईटीएफ किंवा गोल्ड बाँड खरेदी करुन त्यात पैसे गुंतवावेत का, याबाबत गुंतवणूकदार विचार करत आहेत.
advertisement
तुम्हाला शॉर्ट-टर्मपुरते पैसे गुंतवायचे असतील तर गोल्ड ईटीएफ हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. यात आपल्या इच्छेनुसार पैसे काढण्याची सोय असते. आपण आपल्या मर्जीप्रमाणे खरेदी किंवा विक्री करू शकतो. गोल्ड ईटीएफमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत पर्चेसिंग चार्ज कमी लागतो. हे सोनं 100 % शुद्ध असतं. त्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा पर्यायही असतो. गोल्ड ईटीएफचा वापर कर्ज घेताना सिक्युरिटी म्हणूनही करता येतो. डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्डच्या किमती सारख्या असतात. फिजिकल गोल्ड किंवा प्रत्यक्ष सोनं सांभाळायचं तर ती जोखीम असते. ईटीएफ किंवा गोल्ड बाँडबाबत चोरी होण्याची जोखीम नसते. सोनं खरेदी करताना सराफ व्यावसायिक कॅरेटबाबत फसवणूक करू शकतात. गोल्ड बाँडमध्ये अशी शक्यता नसते.
advertisement
मार्केट एक्स्पर्ट्सच्या मते सॉव्हरीन गोल्ड बाँड हा मध्यम किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असतो. त्यात आठ वर्षांचा लॉक इन पीरियड असतो. त्यापूर्वी पैसे काढता येत नाहीत; मात्र आठ वर्षांनंतर इन्कम टॅक्सवर सवलतीसह 2.5 टक्के एवढे रिटर्न्स निश्चित मिळतात. हे सॉव्हरीन गोल्ड बाँड रुपयांत खरेदी करता येतात. 1 ग्रॅम ते जास्तीत जास्त चार किलो एवढी खरेदी एक व्यक्ती करू शकते. ही योजना सरकारनेच सुरू केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 28, 2024 11:09 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Investment : सोनं, ETF की गोल्ड बाँड, चांगल्या रिटर्न्ससाठी कशात करायची गुंतवणूक? असं आहे गणित