Gold Silver Price : सोन्याचे दर घसरले, चांदी मात्र महागली! आजचा १० ग्रॅमचा दर काय? करा पटापट चेक

Last Updated:

Gold Price Today : काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा सोनं स्वस्त झालं आहे.

सोन्याचे दर घसरले, चांदी मात्र महागली! आजचा १० ग्रॅमचा दर काय?  करा पटापट चेक
सोन्याचे दर घसरले, चांदी मात्र महागली! आजचा १० ग्रॅमचा दर काय? करा पटापट चेक
Gold Silver Price 12 Nov 2025: मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीचे दर चांगलेच घसरले आहेत. दिवाळीपासून सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा सोनं स्वस्त झालं आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
आज दुपारी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८७ रुपयांनी घसरून १,२३,३६२ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. जीएसटीसह, २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२७,०८२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह चांदी १,५९,६९७ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. चांदीचा दर आज १,५५,०४६ रुपये प्रति किलोवर उघडली. जीएसटीशिवाय चांदीच्या दरात २८६ रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली. या वर्षी, सोने ४७,६२२ रुपये प्रति १० ग्रॅम महाग झाले आहे, तर चांदी ६४,०२९ रुपयांनी वाढली आहे.
advertisement
सोन्याच्या दराने १७ ऑक्टोबर रोजी त्याच्या दराचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली होती. मात्र, जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मधल्या काही दिवसात सोन्याच्या दराने पुन्हा उसळण घेतली होती. आजच्या दरानंतर आता सोन्याचा दर हा त्याच्या उच्चांकापासून ७५१२ रुपयांनी स्वस्त आहे. चांदीच्या किमती १४ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकी दरापेक्षा २३,०५४ रुपयांनी कमी झाल्या आहेत.
advertisement

>> कॅरेटनुसार सोन्याच्या किमती

आज, २३ कॅरेट सोन्याचे दर देखील ७८४ रुपयांनी स्वस्त झाले. प्रति १० ग्रॅम १,२२,८६८ वर सोन्याचा दर उघडला. जीएसटीसह त्याची किंमत आता १,२६,५५४ आहे. मेकिंग चार्जेस अद्याप समाविष्ट नाहीत.
२२ कॅरेट सोन्याची किंमत
२२ कॅरेट सोन्याची किंमत ७२० रुपयांनी कमी झाली आहे, ती प्रति १० ग्रॅम १,१३,००० रुपयांवर पोहोचली आहे. जीएसटीसह हा दर १,१६,३९० आहे.
advertisement
१८ कॅरेट सोन्याची किंमत
१८ कॅरेट सोन्याचे दर ५९० रुपयांनी कमी झाला आहे. प्रति १० ग्रॅम ९२,५२२ रुपयांवर दर पोहोचले आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९५,२९७ रुपयांवर पोहोचली आहे.
>> मुंबई-पुण्यात सोनं-चांदीचा दर काय?
> मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव: प्रति १० ग्रॅम १,२४,२४० रुपये
> मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव: प्रति १० ग्रॅम १,१३,८८७ रुपये
advertisement
> मुंबईत एमसीएक्स सोन्याचा भाव: प्रति १० ग्रॅम १,२३,९८६ रुपये
> मुंबईत चांदीचा भाव: प्रति किलो ₹१,५५,७६०
> मुंबईत एमसीएक्स चांदी ९९९ चा भाव: प्रति किलो ₹१,५५,७६०
>> पुण्यात सोन्याचा भाव
> पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव: प्रति १० ग्रॅम १,२४,१९० रुपये
> पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव: प्रति १० ग्रॅम १,१३,८४१ रुपये
advertisement
> पुण्यात एमसीएक्स सोन्याचा भाव: प्रति १० ग्रॅम १,२३,९४३ रुपये
> पुण्यात चांदीचा भाव: प्रति किलो १,५५,६९० रुपये
> पुण्यात MCX चांदी ९९९ ची किंमत: १,५५,६९० रुपये प्रति किलोग्रॅम
आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर करण्यात येतो. त्याशिवाय, विविध कारणांनी विविध घटकांमध्ये सोनं-चांदीच्या दरात १००० ते २००० रुपयांचा फरक दिसू शकतो. यामुळे तुमच्या शहरात ₹१,००० ते ₹२,००० चा फरक पडू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price : सोन्याचे दर घसरले, चांदी मात्र महागली! आजचा १० ग्रॅमचा दर काय? करा पटापट चेक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement