Gold Investment : सोन्यानं गाठलाय दराचा उच्चांक, गुंतवणुकीसाठी Gold ETF ची निवड कशी करणार? एक्सपर्टने दिली टिप्स
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Investment ETF vs Gold FoF : गुंतवणूकदार ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) कडे वळत आहेत. मात्र, योग्य ईटीएफ निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Gold ETF : या वर्षात सोनं-चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. सोन्याचा दर या वर्षी 60 टक्क्यांहून अधिक वधारला. येत्या काही दिवसात सोन्याच्या दरात वाढ होण्याच अंदाज आहे. आगामी काही महिन्यातच सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम दीड ते दोन लाखांच्या घरात पोहचण्याचा अंदाज आहे. सोन्याचा वाढता दर पाहता अनेकांनी डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. गुंतवणूकदार ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) कडे वळत आहेत. मात्र, योग्य ईटीएफ निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
जागतिक पातळीवर असलेल्या अस्थिरतेमुळे २०२५ मध्ये सोने पुन्हा एकदा एक गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय झाला आहे. गुंतवणूकदार केवळ दागिने किंवा नाण्यांऐवजी एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणि गोल्ड फंड्स ऑफ फंड्स (एफओएफ) सारख्या डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळत आहेत. हे पर्याय परवडणारा णि पारदर्शक आहेत, शुद्धता, साठवणूक किंवा शुल्क आकारण्याची चिंता न करता यात गुंतवणूक केली जाते.
advertisement
गोल्ड ईटीएफ हे पूर्णपणे शुद्ध भौतिक सोन्यात गुंतवणूक करतात. प्रत्येक ईटीएफ युनिटमध्ये अंदाजे ०.०१ ग्रॅम सोने असते आणि हे युनिट स्टॉक एक्सचेंजवर शेअर्ससारखे व्यवहार करतात. यासाठी डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते आवश्यक आहे.
>> भारतातील प्रमुख गोल्ड ईटीएफ
advertisement
निप्पॉन इंडिया गोल्ड ईटीएफ
एसबीआय गोल्ड ईटीएफ
एचडीएफसी गोल्ड ईटीएफ
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ
अॅक्सिस गोल्ड ईटीएफ
कोटक गोल्ड ईटीएफ
आदित्य बिर्ला सन लाईफ गोल्ड ईटीएफ
इन्व्हेस्को इंडिया गोल्ड ईटीएफ
advertisement
मिराई अॅसेट गोल्ड ईटीएफ
क्वांटम गोल्ड ईटीएफ
हे फंड खर्चाचे प्रमाण हे लिक्विडिटी आणि ट्रॅकिंग त्रुटींमध्ये थोडेसे बदलतात. त्यामुळे तुमच्या गुंतवणूक परताव्यावर परिणाम करू शकतात.
>> गोल्ड एफओएफ (Gold FoFs)
advertisement
गोल्ड एफओएफ (Gold FoFs) हे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांना डीमॅट खात्याची आवश्यकता नसते. ते एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे देखील सहजपणे गुंतवता येतात. एफओएफमध्ये खर्चाचे प्रमाण थोडे जास्त असते. मात्र, तुम्ही गुंतवणुकीसाठी नवखे असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय आहे.
advertisement
>> भारतातील प्रमुख सोन्याच्या FoF
निप्पॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग्ज फंड
SBI गोल्ड फंड
HDFC गोल्ड फंड
ICICI प्रुडेन्शियल रेग्युलर गोल्ड सेव्हिंग्ज फंड
अॅक्सिस गोल्ड फंड
कोटक गोल्ड फंड
आदित्य बिर्ला सन लाईफ गोल्ड फंड
मिराई अॅसेट गोल्ड सेव्हिंग्ज फंड
'बिझनेस स्टँडर्ड'च्या वृत्तानुसार, सोने ETF किंवा FoF निवडताना खर्चाचे प्रमाण (कमी तितके चांगले), तरलता (जास्त तितके चांगले) आणि ट्रॅकिंग एरर (कमी तितके चांगले) विचारात घेण्याची शिफारस व्यवसाय सल्लागार विजय माहेश्वरी केली आहे. किंमती वाढत असताना मोठी गुंतवणूक करण्याऐवजी दरमहा गुंतवणूक असलेल्या SIP द्वारे लहान रकमेत गुंतवणूक करण्याचा सल्ला माहेश्वरी यांनी दिला. सोन्यातील गुंतवणूक ही तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओच्या 5-10% पर्यंत मर्यादित असले पाहिजे, ही गुंतवणूक उत्पन्न निर्माण करत नाही परंतु बाजारातील अस्थिरतेपासून बचाव म्हणून काम करते.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून गुंतवणुकीचा कोणताही सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Investment : सोन्यानं गाठलाय दराचा उच्चांक, गुंतवणुकीसाठी Gold ETF ची निवड कशी करणार? एक्सपर्टने दिली टिप्स