Cricketer Passes Away : क्रिडाविश्वात शोककळा! स्टार क्रिकेटपटूचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन, 8 वर्षांची मृत्यूशी झुंज अखेर संपली
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Akshu Fernando Death : कोलंबो येथे रेल्वे रूळ ओलांडत असताना झालेल्या एका दुर्दैवी ट्रेन अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर तो कित्येक वर्षे कोमात होता.
Akshu Fernando Passes Away : श्रीलंका क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद वार्ता समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका युवा खेळाडूने अखेरचा श्वास घेतला असून, या बातमीमुळे क्रीडा क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. या स्टार खेळाडूचा प्रवास एका भीषण अपघातामुळे काळवंडला होता, ज्याचा अंत आता अत्यंत वेदनादायक झाल्याने सध्या क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून माजी क्रिकेटपटू अक्षु फर्नांडो आहे.
अवघ्या 27 व्या वर्षी भीषण अपघात
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अक्षु फर्नांडो यांचे निधन झालं असून तो 2010 च्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा महत्त्वाचा हिस्सा होता. कोलंबो येथे रेल्वे रूळ ओलांडत असताना झालेल्या एका दुर्दैवी ट्रेन अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर तो कित्येक वर्षे कोमात होता आणि लाइफ सपोर्टवर आपली जगण्याची लढाई लढत होता. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याच्यासोबत हा भीषण अपघात घडला होता.
advertisement
Former Sri Lanka Under-19 cricketer Akshu Fernando has passed away today after spending several years in a coma following a tragic railway accident. pic.twitter.com/aLHkY1rnli
— DANUSHKA ARAVINDA (@DanuskaAravinda) December 30, 2025
अक्षु फर्नांडो कोण होता?
अक्षु हा उजव्या हाताचा फलंदाज होता आणि विशेष म्हणजे या अपघाताच्या काही दिवस आधीच त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. 9 वर्षांच्या डोमेस्टिक करियरमध्ये त्याने कोल्ट्स, पानाडुरा आणि चिलाव स्पोर्ट्स क्लब अशा विविध नामांकित क्लब्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या नावावर वरिष्ठ स्तरावर 7 अर्धशतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय कॉमेंटेटर रोशन अभयसिंघे यांनी अक्षुला श्रद्धांजली वाहताना एक "नेकदिल आणि हसरा तरुण" अशा शब्दांत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
गुणवान खेळाडू गमावला
दरम्यान, आकड्यांचा विचार केला तर अक्षुने 39 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 1067 रन्स केले होते. तसेच 20 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 298 रन्स बनवले होते. त्याच्या जाण्याने श्रीलंका क्रिकेटने एक गुणवान खेळाडू गमावला, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricketer Passes Away : क्रिडाविश्वात शोककळा! स्टार क्रिकेटपटूचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन, 8 वर्षांची मृत्यूशी झुंज अखेर संपली









