Gold News: चीनच्या 'गोल्ड गेम'ने भारतच नाही तर संपूर्ण जग हादरलं! काय सुरू आहे नेमकं

Last Updated:

China Gold Game : अमेरिकाला मागे ढकलण्यासाठी चीनकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आता चीनच्या एका डावामुळे भारतच नाही तर सगळ्या जगाचं टेन्शन वाढवलं आहे.

चीनच्या 'गोल्ड गेम'ने भारतच नाही तर संपूर्ण जग हादरलं! काय सुरू आहे नेमकं
चीनच्या 'गोल्ड गेम'ने भारतच नाही तर संपूर्ण जग हादरलं! काय सुरू आहे नेमकं
Gold News : जागतिक आर्थिक महासत्तेच्या स्पर्धेत अमेरिकाला मागे ढकलण्यासाठी चीनकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आता चीनच्या एका डावामुळे भारतच नाही तर सगळ्या जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनने गोल्ड गेम खेळला असून आता सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जून 2025 मध्ये चीनमध्ये सोन्याच्या खरेदीचा दर थोडा मंदावला असला तरी, पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या गुंतवणुकीने विक्रमी कामगिरी केली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालात इतरही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामुळे चीनच्या नवीन 'गोल्ड गेम'ची खेळाची बाब समोर आली आहे. अहवालात म्हटले आहे की आतापर्यंतचा सर्वाधिक खरेदी गोल्ड ईटीएफमध्ये दिसून आली. तर महागड्या सोन्यामुळे लोक दागिने खरेदी करण्यापासून दूर जात असल्याचे दिसून आले. 2025 च्या पहिल्या सहामाहीत, चिनी गोल्ड ईटीएफमध्ये 64,000 कोटी रुपये (US$ 8.8 अब्ज) गुंतवण्यात आले. ही आतापर्यंतची ऐतिहासिक गुंतवणूक असल्याचे सांगण्यात आले आहे.
advertisement

दागिन्यांच्या मागणीत घट

जूनमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घाऊक मागणीत 10 टक्के घट झाली. उच्च किमती आणि कमकुवत ग्राहक भावनांमुळे लोक नवीन खरेदी टाळताना दिसून आले.

90 टन सोन्याची विक्री

जूनमध्ये एसजीईमधून 90 टन सोने काढून घेण्यात आले. जे गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. पहिल्या सहामाहीत 678 टन इतके होते. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्यांनी कमी आहे.
advertisement
सोन्याच्या किमती पहिल्या सहामाहीत अमेरिकन डॉलर्समध्ये 23 टक्के आणि चिनी युआन (आरएमबी) मध्ये 21 टक्क्यांनी वाढल्या. 2016 नंतरची सर्वात जलद वाढ आहे.

'पीपल्स बँक ऑफ चायना'कडून सोने खरेदी

चीनच्या मध्यवर्ती बँकेने सलग आठव्या महिन्यात सोने खरेदी केले आणि पहिल्या सहामाहीत एकूण 19 टन सोन्याचा साठा वाढवला. चीनमध्ये आता 2299 टन सोने आहे. जूनमध्ये सोन्याचे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट मंदावले होते. परंतु पहिल्या सहामाहीत सरासरी 534 टन प्रतिदिन व्यवहार झाले. ही आतापर्यंतचे सर्वाधिक अर्धवार्षिक मूल्य असल्याचे सांगण्यात येते.
advertisement

सोन्याच्या आयातीत घट

चीनने मे 2025 मध्ये 89 टन सोने आयात केले. एप्रिलपेक्षा 21 टक्के आणि गेल्या वर्षीच्या मेपेक्षा 31 टक्के कमी आहे. दागिन्यांची मागणी कमी असणे हे याचे मुख्य कारण होते.

ग्राहकांकडून खरेदीबाबत सावधगिरी...

सोने अजूनही एक सुरक्षित गुंतवणूक माध्यम आहे, विशेषतः अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि देशांतर्गत मालमत्तेची कमकुवत कामगिरी समोर आल्यानंतर सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याचे आणखीच अधोरेखित झाली आहे.
advertisement
चीनमध्ये सोनं खरेदी ही फक्त दागिन्यापुरती नसून एक धोरणात्मक बाब म्हणून समोर आली आहे. ग्राहक दागिन्यांपासून दूर जात असताना, ईटीएफ आणि बार-कॉइन सारख्या पर्यायांमध्ये विक्रमी गुंतवणूक केली जात आहे. मध्यवर्ती बँकेतील खरेदी देखील सोनं ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचे संकेत दर्शवत आहेत.

भारतावर काय परिणाम होईल?

भारतात सोन्याच्या किमती वाढण्याचा धोका
चीनमधील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. यामुळे जागतिक मागणी वाढते आणि याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या किमतींवरही होईल. म्हणजेच, येथेही सोने महाग होऊ शकते.
advertisement
दागिन्यांच्या व्यवसायावर दुहेरी दबाव
चीनप्रमाणे, भारतातील दागिन्यांचे क्षेत्र आधीच कमकुवत आहे. जर किंमती आणखी वाढल्या तर लग्न आणि सणांच्या वेळी सोन्याची विक्री आणखी कमी होऊ शकते, ज्याचा परिणाम सोनार आणि लहान व्यावसायिकांवर होईल.
रुपया कमकुवत होण्याची भीती
जर भारताला महागडे सोने आयात करावे लागले तर चालू खात्यातील तूट (CAD) वाढेल, ज्यामुळे रुपया-डॉलर विनिमय दरावर दबाव येऊ शकतो.
advertisement
भारतात गोल्ड ETF ला चालना...
चीनमध्ये गोल्ड ETF मध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. हा ट्रेंड भारतातही येऊ शकतो, विशेषतः जर शेअर बाजारात अनिश्चितता कायम राहिली तर या ईटीएफ अधिक पसंती मिळू शकेल.

संपूर्ण जगावर परिणाम

सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात
चीनच्या मध्यवर्ती बँकेकडून आणि गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने सोन्याच्या जागतिक पुरवठ्यावर दबाव येईल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढतील.
जेव्हा चीनसारखे देश सोन्याचे साठे वाढवतात तेव्हा ते सूचित करतात की त्यांना आता डॉलर किंवा इतर मालमत्तेवर विश्वास राहिलेला नाही. यामुळे इतर देशांच्या मध्यवर्ती बँका देखील सोने खरेदी करू लागतात.
अमेरिकन डॉलर आणि बाँड बाजारावर परिणाम
जर जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्याचा पर्याय निवडला तर ते अमेरिकन बाँड आणि डॉलरमधून पैसे काढू शकतात. ज्यामुळे अमेरिकेच्या कर्ज घेण्यावर आणि चलनावर परिणाम होईल.
व्याजदरांवर परिणाम
जर सोन्याचे भाव वाढत राहिले आणि गुंतवणूकदार महागाईच्या भीतीने सोन्यात गुंतवणूक करत राहिले, तर व्याजदरांवरही दबाव येईल. विशेषतः उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये याचा परिणाम जाणूव शकतो.
मराठी बातम्या/मनी/
Gold News: चीनच्या 'गोल्ड गेम'ने भारतच नाही तर संपूर्ण जग हादरलं! काय सुरू आहे नेमकं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement