advertisement

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आजचा दर काय?

Last Updated:

Gold Price Today : आज झालेल्या दरातील घसरणीने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.

ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आजचा दर काय?
Gold Silver Price Today:  आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. सोनं-चांदीच्या दराने रेकोर्ड ब्रेक दर गाठला. मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात जबरदस्त तेजी आली होती. आज या तेजीला ब्रेक लागल्याचे दिसून आले. आज झालेल्या दरातील घसरणीने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.
आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोमवारच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम १,३०६ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीतही घट झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत १,९१,९७१ रुपये आहे. काल, सोमवारी, चांदीची किंमत प्रति किलो १,९२,२२२ रुपये होती. चांदीच्या किमतीत २२५ रुपयांची घसरण झाली आहे.
advertisement

> २४ कॅरेट सोन्याचा दर काय?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या दरानुसार, १६ डिसेंबर रोजी दुपारी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३२,१३६ रुपये झाली. यापूर्वी, सोमवारी, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३३,४४२ रुपये होती.
आज, मंगळवारी, २३ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३१,६०७ रुपये आहे. काल, सोमवारी, ते प्रति १० ग्रॅम १३२,९०८ रुपये होते. आज, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२१,०३७ रुपये आहे आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९९,१०२ रुपये आहे. दरम्यान, १४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७७,३०० रुपये झाली आहे.
advertisement

>> चांदीच्या किमतीत लक्षणीय घट

शुक्रवारी संध्याकाळी, चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम १,९५,१८० रुपये झाली. मात्र, तेव्हापासून चांदीच्या किमतीत घट झाली आहे. चांदी बाजाराचे निरीक्षण करणाऱ्या तज्ज्ञांनी नजीकच्या काळात चांदीचा दर २ लाख रुपयांहून अधिक वाढू शकतो असा, अंदाज व्यक्त केला आहे. औद्योगिक मागणीमुळे चांदीला महत्त्व येणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आजचा दर काय?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement