1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांसाठी मोठा निर्णय, चांदी आणखी महाग होणार?

Last Updated:

चांदीचे दर 1 लाख 20 हजारवर, केंद्र सरकार 1 सप्टेंबर 2025 पासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लागू करणार, BIS ने 6 शुद्धता मानक व HUID कोड अनिवार्य केले.

News18
News18
मुंबई: चांदीने नवीन रेकॉर्ड केला आहे. चांदीचे दर 1 लाख 20 हजारवर गेले आहेत. आता हे दर आणखी वाढू शकतात. चांदीचे दागिने खरेदी करताना विशेष काळजी घ्या, त्याचं कारण म्हणजे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फक्त सोन्याच्या दागिन्यांवर शुद्धतेची हमी देणारी हॉलमार्किंग बंधनकारक होतं. मात्र आता चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंग द्यावं लागणार आहे.
केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2025 पासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवा नियम लागू करण्याची तयारी केली. सुरुवातीला हा नियम ऐच्छिक असणार आहे, म्हणजेच ग्राहकाला हॉलमार्क असलेली किंवा नसलेली चांदीची ज्वेलरी खरेदी करण्याचा पर्याय असेल. मात्र, भविष्यात सोन्याप्रमाणेच चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग अनिवार्य होण्याची शक्यता आहे.
काय आहे नवा बदल?
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने चांदीच्या शुद्धतेसाठी सहा मानक ठरवले आहेत. त्यानुसार 800,835, 900, 925, 970 आणि 990. या नव्या नियमानुसार, आता प्रत्येक हॉलमार्क असलेल्या चांदीच्या दागिन्यावर 6 अंकी 'युनिक कोड' (HUID) असेल. या कोडमुळे दागिन्याची शुद्धता किती आहे आणि तो खरा आहे की बनावट, हे लगेच ओळखता येईल. यामुळे जुन्या हॉलमार्किंग प्रणालीपेक्षा ही नवीन पद्धत अधिक पारदर्शक असणार आहे. यामुळे फसवणूक टाळता येणार आहे.
advertisement
हॉलमार्किंग का आवश्यक आहे?
हॉलमार्किंग म्हणजे कोणत्याही धातूची शुद्धता प्रमाणित करणे. बीआयएसच्या प्रयोगशाळेत दागिन्यांची तपासणी करून त्यावर विशिष्ट चिन्ह (हॉलमार्क) लावण्यात येते. यामुळे ग्राहक पूर्ण विश्वासाने दागिने खरेदी करू शकतो. हॉलमार्किंगमुळे दागिन्यांमध्ये होणारी भेसळ थांबवता येते आणि ग्राहकांना त्यांच्या पैशाचे योग्य मूल्य मिळते.
ग्राहकांना नेमका काय फायदा होणार?
सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक चांदीच्या दागिन्यांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. पण नव्या हॉलमार्क आणि एचयूआयडी नंबरमुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल. ग्राहक आता बीआयएस केअर ॲप वापरून व्हेंरीफाय एचयुआयडी फीचरच्या मदतीने दागिन्यांवरील कोड खरा आहे की नाही हे सहज तपासू शकतील. यामुळे चांदीच्या दागिन्यांची खरेदी अधिक सुरक्षित होईल.
advertisement
सोन्याप्रमाणेच चांदीचे नियम
2021 मध्ये सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले होते, त्याचप्रमाणे आता चांदीवरही हे नियम लागू होत आहेत. यामागे दागिन्यांच्या बाजारात अधिक पारदर्शकता आणणे आणि ग्राहकांना शुद्ध उत्पादन देणे, हाच उद्देश आहे. 1 सप्टेंबरनंतर ग्राहकांकडे हॉलमार्क आणि विना-हॉलमार्क असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. मात्र, जाणकारांच्या मते, ग्राहक हळूहळू हॉलमार्क असलेल्या दागिन्यांनाच अधिक पसंती देतील. यामुळे केवळ ग्राहकांचाच फायदा होणार नाही, तर संपूर्ण दागिने उद्योगातही विश्वासार्हता वाढेल.
मराठी बातम्या/मनी/
1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांसाठी मोठा निर्णय, चांदी आणखी महाग होणार?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement