1 ग्रॅम Gold घ्यायला एक पगार द्यावा लागणार, बाप्पाचं आगमन होताच सोन्या-चांदीचे दर वाढले

Last Updated:

बाप्पाच्या आगमनानंतर सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. 1 ग्रॅम सोन्यासाठी 10 हजार 200 रुपये लागतात. अमेरिकेच्या घडामोडींमुळे दर वाढले आहेत.

News18
News18
बाप्पाचं आगमन होताच सोन्या चांदीचे दर गगनाडा भिडले आहेत. कधी एकेकाळी सोन्या चांदीचे दर 19-20 रुपये होते. त्यावरुन 5-6-7 हजारवर आले आणि आता एक ग्रॅम सोनं घेण्याचीही नामुश्की आहे. दिवसेंदिवस सोन्या-चांदीचे दर वाढतच आहेत मात्र पगार काही केल्या तेवढ्या स्पीडने वाढेना अशी परिस्थिती सध्या आहे. एक ग्रॅम सोन्याचं नाणं घेण्यासाठी 10 हजार रुपयांहून अधिक बातमी घ्यावी लागणार आहे.
एक ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 10 हजार 200 रुपये मोजावे लागणार आहे. GST सह हे 11 ते 11500 च्या आसपास रक्कम जाते. तर 22 कॅरेट 1 ग्रॅम गोल्डसाठी ग्राहकांना 9 हजार 300 रुपये मोजावे लागणार आहेत. 18 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना एका ग्रॅमसाठी 7600 रुपये मोजावे लागणार आहेत. 8 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना जवळपास 81 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहेत.
advertisement
22 कॅरेटचा विचार करायचा झाला तर 8 ग्रॅमसाठी 75 हजार रुपये तर 1 तोळ्यासाठी 93 हजार 900 रुपये मोजावे लागणार आहेत. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरांमध्ये किंचित अशी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 350 रुपयांनी वाढले आहेत. बाप्पाच्या आगमनानंतर सोन्या चांदीचे दर गगनाला पोहोचले असून नवीन रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. 18 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 8 ग्रॅमसाठी 61 हजार 400 रुपये मोजावे लागतील तर 1 तोळ्यासाठी 76 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
advertisement
एक ऑगस्टपासून जवळपास 24 कॅरेट सोन्यात 2 ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. 8 ऑगस्ट रोजी सर्वात उच्चांकी दर होता, त्यानंतर पुन्हा घसरला आणि आता पुन्हा एकद दरवाढ व्हायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अमेरिकेनं लादलेलं टेरिफ, आंतरराष्ट्रीय घडामोडी, रशिया युक्रेन संघर्ष या सगळ्याचा परिणाम सोन्या चांदीवर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. याउलट आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
फेब्रुवारीपासून विचार केला तर प्रत्येक ग्रॅममागे 3000 रुपयांची वाढ आतापर्यंत झाली आहे. या स्पीडने जर सोनं वाढत राहिलं तर 1 लाख 10 हजारचा टप्पा पार करेल. चांदीचे दर 3000 रुपयांनी महाग झाले आहेत. चांदीचे दर 1,18,000 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. सोमवारी चांदीचे दर 1,15,000 रुपये किलोवर होते. एचडीएफसी सिक्युरिटीज कमोडिटी तज्ज्ञ सौमिल गांधी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांना पदावरून काढून टाकल्यानंतर गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या आहेत. या निर्णयामुळे मध्यवर्ती बँकेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले, ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या.
view comments
मराठी बातम्या/मनी/
1 ग्रॅम Gold घ्यायला एक पगार द्यावा लागणार, बाप्पाचं आगमन होताच सोन्या-चांदीचे दर वाढले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement