HDFC बँकेत अकाउंट आहे का? मग ही माहिती अवश्य वाचा, बँकेने दिला इशारा 

Last Updated:

HDFC बँकेने डिसेंबरमध्ये त्यांच्या सिस्टीम अपग्रेड करण्यासाठी आणि एकूण बँकिंग कार्यक्षमता सुधारण्यासाठी दोन शेड्यूल्ड मेंटेनन्स विंडो जाहीर केल्या आहेत.

एचडीएफसी बँक अपडेट
एचडीएफसी बँक अपडेट
HDFC Bank Update : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने डिसेंबरमध्ये त्यांच्या सिस्टीम अपग्रेड करण्यासाठी आणि एकूण बँकिंग कार्यक्षमता सुधारण्यासाठी दोन शेड्यूल्ड मेंटेनन्स विंडो जाहीर केल्या आहेत. बँकेने सांगितले की HDFC डिसेंबर 2025 आणि 21 डिसेंबर 2025 रोजी पहाटेच्या वेळी आवश्यक टेक्निकल काम केले जाईल.
दोन दिवस चालेल मेंटेनेंस
एचडीएफसी बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, तुमचा बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी, आम्ही 13 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 02:30 ते सकाळी 06:30 आणि 21 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 02:30 ते सकाळी 06:30 पर्यंत आवश्यक सिस्टम मेंटेनन्स करत आहोत. प्रत्येक मेंटेनन्स विंडो चार तास चालेल.
advertisement
बँकेच्या म्हणण्यानुसार, देखभालीचे काम खालील तारखांसाठी प्लॅन आहे:
13 डिसेंबर 2025 - पहाटे 2:30 ते सकाळी 6:30
21 डिसेंबर 2025 - पहाटे 2:30 ते सकाळी 6:30
शेड्यूल्ड डाउनटाइम दरम्यान, ग्राहक HDFC बँक अकाउंटशी जोडलेल्या यूपीआय सर्व्हिस वापरू शकणार नाहीत. एचडीएफसी बँकेच्या बचत आणि चालू खात्यांद्वारे यूपीआय व्यवहार, एचडीएफसी बँकेने जारी केलेल्या रुपे क्रेडिट कार्ड वापरून केलेले पेमेंट आणि एचडीएफसी बँक मोबाइल बँकिंग अॅपद्वारे केलेले व्यवहार उपलब्ध राहणार नाहीत. एचडीएफसी बँकेवर त्यांचा पेमेंट सेवा प्रदाता म्हणून अवलंबून असलेल्या थर्ड-पार्टी अ‍ॅप्स (टीपीएपी) द्वारे प्रोसेस केलेले यूपीआय पेमेंट आणि ज्या व्यापाऱ्यांचे यूपीआय सेटलमेंट किंवा कलेक्शन त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यांशी जोडलेले आहेत त्यांनाही या तासांमध्ये सर्व्हिसमध्ये प्रॉब्लम येईल.
advertisement
HDFC बँक ग्राहकांसाठी पर्याय
कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी, HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मेंटेनेंसच्या वेळेत पेमेंट आणि ट्रान्सफरसाठी PayZapp वॉलेटवर स्विच करण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने यूझर्सना आश्वासन दिले आहे की त्यांच्या PayZapp सेवा सामान्यपणे काम करत राहतील.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
HDFC बँकेत अकाउंट आहे का? मग ही माहिती अवश्य वाचा, बँकेने दिला इशारा 
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement