Multibagger Stock: 8 रुपयांचे झाले 1500, 1 लाख गुंतवणाऱ्यांना केलं करोडपती, कोणता हा स्टॉक?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Multibagger Stock: आता घेतला नाही म्हणून करा पश्चाताप! 8 रुपयांच्या एका स्टॉकची किंमत 1500, गुंतवणूकदार झाले मालामाल, कोणत्या कंपनीचा आहे हा स्टॉक पाहा संपूर्ण डिटेल्स
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण संयमाचं फळ सर्वात मोठा नफा असतो, हे सत्य जेवढं प्रत्यक्ष आयुष्यात खरं आहे तितकंच स्टॉक मार्केटसाठी देखील खरं आहे बरं का. भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या पेनी स्टॉकने धुमाकूळ घातला आहे. असे काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न देऊन मालामाल केलं आहे. पण काही शेअर्स असे असतात, जे अतिशय कमी काळात आश्चर्यकारक रिटर्न देतात.
advertisement
advertisement
advertisement
८ रुपयांवरून १५०० रुपयांच्या पार पोहोचलेल्या या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल १८,५५२ टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे. जर आपण या परताव्याचे आकडे पाहिले, तर ज्या व्यक्तीने ५ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती आजपर्यंत टिकवून ठेवली असेल, तर त्याचे १ लाख रुपये आता १.८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असतील.
advertisement
advertisement
जिंदल फोटो लिमिटेड कंपनीचा मार्केट कॅपिटल सध्या १५६० कोटी रुपये आहे. कंपनीची स्थापना १९८६ मध्ये झाली होती आणि ती प्रामुख्याने फोटोग्राफिक बिझनेस सेक्टरमध्ये एक मोठे नाव आहे. विशेष म्हणजे, त्यांचे 'कोडक' आणि 'फूजीफिल्म'सारखे ब्रँड्स ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. एका छोट्या कंपनीने शेअर बाजारात केलेला हा मोठा 'धमाका' अनेकांना अचंबित करून गेला आहे.
advertisement










