Mumbai News: चिमुकली पळत पळत आली अन् होत्याचं नव्हतं झालं, मुंबईत लहानगीसोबत घडलं भयंकर, सीसीटीव्ही समोर
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai News: शभरात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे.
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई: देशभरात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. विक्रोळीतील टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त लावलेला एक जड स्पीकर ३ वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओ समोर आला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीनिमित्त आंबेडकर नगरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी परिसरात मोठे स्पीकर्स लावले होते. यावेळी ही ३ वर्षांची मुलगी परिसरात खेळत असताना अचानक एक मोठा स्पीकर तिच्या अंगावर कोसळला. हा आघात इतका भीषण होता की, चिमुकली गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?
या दुर्घटनेमागे एका चिंध्या गोळा करणाऱ्या व्यक्तीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे प्राथमिक आरोप होत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. डोक्यावरून चिंधीचं मोठं गाठोड घेऊन जात असताना गाठोडं हे वायरमध्ये अडकलं आणि स्पीकर पडला. नेमकं त्याच वेळेस ३ वर्षांची चिमुकली पळत येत होती. यावेळी स्पीकर तिच्या अंगावर पडला. सीसीटीव्हीमध्ये अंगाचा थरकाप उडवणारे दृष्य कैद झाले आहेत. त्यामध्ये स्पीकर कशामुळे पडला याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. एका व्यक्तीच्या चुकीच्या हालचालीमुळे हा जड स्पीकर तोल जाऊन थेट मुलीच्या अंगावर पडल्याचे बोलले जात आहे.
advertisement
>> सीसीटीव्हीमधील दृष्ये तुम्हाला विचलित करू शकतात...
एका छोट्या चुकीमुळे चिमुकलीचा जीव गेल्याने कुटुंबाला प्रचंड धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 8:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai News: चिमुकली पळत पळत आली अन् होत्याचं नव्हतं झालं, मुंबईत लहानगीसोबत घडलं भयंकर, सीसीटीव्ही समोर








