एका सहीला उशीर नडला! ट्रम्प यांनी वाचपा काढला; जगभरात खळबळ, शेअर बाजार कोसळण्याची भीती!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाच्या संसदेकडून व्यापार करारास मंजुरी न मिळाल्याने टॅरिफ २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची धमकी दिली आहे, ऑटो, औषधे, लाकूड महागणार.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता दक्षिण कोरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेने व्यापार कराराला मंजुरी देण्यास उशीर केल्याने संतापलेल्या ट्रम्प यांनी टॅरिफ थेट 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची धमकी दिली आहे. या निर्णयामुळे दक्षिण कोरियातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या गाड्या, लाकूड आणि औषधे प्रचंड महाग होणार असून, दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
नेमका वाद काय?
३० जुलै २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली यांच्यात एक ऐतिहासिक व्यापार करार झाला होता. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी या कराराच्या अटींवर दोन्ही देशांनी शिक्कामोर्तबही केले होते. मात्र, दक्षिण कोरियाच्या संसदेने अद्याप या कराराला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. आपल्या देशाच्या संसदेने त्वरित कारवाई केली असताना, दक्षिण कोरियाने टाळाटाळ का केली? असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.
advertisement
कोणत्या वस्तूंवर बसणार फटका?
ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत दक्षिण कोरियाची संसद या कराराचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत खालील वस्तूंवर वाढीव टॅरिफ लागू राहतील:
ऑटोमोबाईल: दक्षिण कोरियाच्या गाड्या अमेरिकन मार्केटमध्ये महागणार.
फार्मा : औषध क्षेत्रातील निर्यातीवर मोठा परिणाम होणार.
लाकूड आणि इतर वस्तू: सध्या असलेले १५% टॅरिफ आता २५% केले जाणार आहेत.
advertisement
'आम्ही वाट पाहणार नाही', ट्रम्प यांचा इशारा
"आम्ही आमच्या बाजूने टॅरिफ कमी करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवली, पण दक्षिण कोरियाकडून तशी अपेक्षा फोल ठरली आहे. कराराचे पालन न करणे हा त्यांचा विशेषाधिकार असला, तरी टॅरिफ वाढवणे हा आमचा अधिकार आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी दक्षिण कोरियावर दबाव निर्माण केला आहे.
या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत, विशेषतः ऑटो आणि टेक इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होऊ शकतो. आज शेअर मार्केट कोसळणार का? भारतीय शेअर मार्केटवर, टेक सेक्टर, ऑटो मोबाईल सेक्टरवर याचा काय परिणाम होतो ते पाहावं लागणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Jan 27, 2026 7:57 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
एका सहीला उशीर नडला! ट्रम्प यांनी वाचपा काढला; जगभरात खळबळ, शेअर बाजार कोसळण्याची भीती!









