Chanakya Niti: दिखावा वेगळा आणि खरं प्रेम वेगळं; तिला/त्याला करेक्ट ओळखण्यासाठी या 5 टिप्स पुरेशा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chanakya Niti Marathi Tips: आजच्या काळात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही, हे ठरवणं खूप कठीण काम झालंय. कोणाच्या मनात काय दडलंय हे ओळखणं सोपं नसतं. पण आचार्य चाणक्यांच्या नीतींमुळे तुम्ही समोरची व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते की नाही (सगळ्या नात्यांमध्ये असलेलें प्रेमसुद्धा) हे सहजपणे ओळखू शकता. आचार्य चाणक्यांनी मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि प्रेमाबद्दल जे सिद्धांत दिले, ते आजही खूप महत्त्वाचे आहेत. प्रेम खरं असतं की हा फक्त देखावा आहे? याबद्दल अनेकांना शंका असते. पण चाणक्यांच्या नीतिशास्त्रात, त्यांनी प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन कसे असते हे स्पष्टपणे सांगितले आहे. ते कसे, ते पाहूया...
लहान-सहान गोष्टींमधून दिसतं प्रेम - जर एखादी व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करत असेल, तर तिचं प्रेम फक्त बोलण्यातूनच नाही, तर तिच्या लहान-सहान कृतींमधून देखील दिसून येतं. अशी व्यक्ती जी आपली खरी काळजी करते, ती केवळ आपण सोबत असतानाच नव्हे, तर आपण जवळ नसतानाही आपली काळजी करते. जेव्हा आपण हसतो तेव्हा ती व्यक्ती आनंदी होते आणि जेव्हा आपण उदास असतो तेव्हा ती दुःखी होते. असं प्रेम दिखावा नसून, हृदयातून आलेली एक भावना आहे.
advertisement
बोलण्यातून नाही, तर कृतीतून होतं प्रेम व्यक्त - चाणक्य म्हणतात त्याप्रमाणे, जी व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करते, ती सर्वात आधी आपल्याला नोटीस करायला सुरुवात करेल. ती व्यक्ती जिथे असेल तिथे आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा जेव्हा त्यांची नजर आपल्यावर पडेल, तेव्हा ते पटकन नजर चोरून आपल्याकडे पाहतील, यावरून त्यांच्या मनात काय आहे हे सहज समजेल. चाणक्य म्हणतात की खरं प्रेम बोलण्यातून नाही, तर कृतीतून व्यक्त होतं. जर तुमच्या जीवनात कोणी वरील गुण दाखवत असेल, तर याचा अर्थ ती व्यक्ती खरोखर तुमची काळजी करते.
advertisement
सन्मान आणि निर्णयाची पूर्ण काळजी - आपल्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असणं हे देखील खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे. आपल्याला काय आवडतं? आपल्याला कशाचा त्रास होतो? आपल्याला काय चांगलं वाटतं? ते प्रत्येक लहान-मोठी गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ते आपल्याशी बोलतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक हास्य आणि शब्दांमध्ये मृदुता दिसून येते. आपण बोललेल्या गोष्टी ते विसरत नाहीत, त्यांना त्या लक्षात राहतात आणि नंतर त्याचा उल्लेखही करतात. आचार्य चाणक्यांच्या मते, जी व्यक्ती खरं प्रेम करते, ती आपल्या सन्मान आणि निर्णयाची पूर्ण काळजी घेते आणि आपले निर्णय लादण्याचा प्रयत्न करत नाही.
advertisement
लहान-सहान कामात मदतीसाठी तयार असणं - चाणक्यांनी सांगितलेल्या प्रेमाच्या लक्षणांपैकी एक म्हणजे, आपल्यावर विशेष लक्ष देणं. ते लहान-सहान कामांमध्येही मदतीसाठी तयार असतात. 'मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो' ही भावना उच्च प्रेमाची सूचक आहे. जर आपण तणावात असू किंवा एखाद्या अडचणीत असू, तर ते सर्वात आधी 'काय झालं?' हे विचारतात. त्यांना असं वाटतं की आपली समस्या त्यांचीच आहे.
advertisement
ईर्ष्या हा प्रेमाचा एक भाग - ईर्ष्या (Jealousy) देखील प्रेमाचा एक भाग आहे. जर आपण इतरांसोबत जास्त हसलो आणि बोललो, तर त्यांना आतून थोडी अधीरता जाणवू शकते. हा राग नसतो... ही फक्त एक भावना आहे, जी त्यांच्या आपल्याबद्दलच्या खऱ्या प्रेमातून निर्माण होते. आपण कोणासोबत राहू आणि कुठे जाऊ हे पाहण्यासाठी जे वाट पाहतात, तेच आपल्यावर खरं प्रेम करतात.
advertisement
समोरच्याच्या प्रगतीचा असतो अभिमान - सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जी व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करते, ती कधीही आपल्याला लहान दाखवणार नाही किंवा आपल्या बोलण्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करणार नाही. जर कोणी असं करत असेल, तर ते खरं प्रेम नाही. याउलट, जो खरं प्रेम करतो, त्याला समोरच्याच्या प्रगतीचा अभिमान वाटतो आणि त्याच्या आनंदात आनंद मिळतो. जेव्हा तो आपल्यासोबत असेल, तेव्हा तो स्वतःमध्ये सर्वोत्तम आणण्याचा प्रयत्न करेल.








