Home Loan फोरक्लोज फायदेशीर आहे की नाही? नियम काय सांगतात? सोप्या भाषेत समजून घ्या!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Home Loan Foreclosure: जर तुम्ही गृहकर्जाच्या ईएमआयमुळे त्रस्त असाल आणि ते लवकर फेडण्याचा विचार करत असाल, तर लगेच कोणताही निर्णय घेऊ नका. कर्ज वेळेपूर्वी बंद करणे तुमच्यासाठी खरंच फायद्याचे आहे का? हे जाणून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
मुंबई: जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल आणि दर महिन्याची ईएमआय (EMI) भरणे आता तुम्हाला त्रासदायक वाटत असेल. तर तुमच्या मनात नक्कीच विचार येत असेल की कुठूनतरी पैसे मिळाले तर लगेच हे कर्ज संपवावे. जर तुम्ही असे काही करण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. होम लोन फोरक्लोज (Home Loan Foreclosure) करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी 3 गोष्टींचा व्यवस्थित विचार करा. यामुळे तुम्हाला हे समजेल की वेळेपूर्वी कर्ज बंद करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही.
गृहकर्जाअंतर्गत आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 24(b) आणि 80C अंतर्गत कर लाभ मिळतात. जर तुम्ही लवकर कर्ज फोरक्लोज केले. तर हे कर लाभ संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे फोरक्लोजरचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा हे गणित करून घ्या की फोरक्लोजरमुळे वाचलेली व्याजाची रक्कम तुमच्या कर लाभापेक्षा जास्त आहे की नाही.
तुम्ही GPay, PhonePe करणार अन् खिसा सरकारचा भरणार? UPI व्यवहाराबाबत आली अपडेट
जर तुम्ही फिक्स्ड रेट लोन घेतले असेल. तर तुम्हाला फोरक्लोजरच्या वेळी अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. फोरक्लोजिंग करण्यापूर्वी तुमच्या बँकेकडून याबद्दल संपूर्ण माहिती नक्की घ्या. तथापि जेव्हा एखादी व्यक्ती फ्लोटिंग रेट्सवर गृहकर्ज घेते. तेव्हा फोरक्लोजरच्या वेळी बँक किंवा HFCs तिच्याकडून कोणत्याही प्रकारचे पेनल्टी किंवा फोरक्लोजर शुल्क आकारत नाहीत. अशा परिस्थितीत ग्राहक कर्जाची आंशिक परतफेड करो किंवा पूर्ण परतफेड करो, त्या बदल्यात त्याच्याकडून कोणतेही शुल्क वसूल केले जात नाही.
advertisement
होम लोनची पूर्ण परतफेड करण्यापूर्वी एकदा हे नक्की करा की ज्या पैशांचा वापर तुम्ही होम लोन संपवण्यासाठी करत आहात, ते पैसे दुसरीकडे गुंतवून तुम्ही होम लोन फोरक्लोजरमधून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त फायदा मिळवू शकता का. जर असे असेल तर त्या पैशांची गुंतवणूक करून फायदा उठवणे आणि होम लोनची ईएमआय सुरू ठेवणे चांगले राहील.
advertisement
गुंतवणूकदारांनो, आता फक्त देवाचा धावा; Gold Silver Ratioने वाजवली धोक्याची घंटा
लोन फोरक्लोजरच्या फायद्यांबद्दल बोलायचं झाल्यास पहिला फायदा तर हाच आहे की, तुम्ही दर महिन्याच्या ईएमआय भरण्याच्या कटकटीतून मुक्त होता. याशिवाय यामुळे तुम्हाला व्याजाच्या रूपात कमी पैसे भरावे लागतात. तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो. पण कर्ज वेळेपूर्वी बंद करण्यासाठी इमर्जन्सी फंडचा वापर करू नका.
advertisement
कर्ज बंद केल्यानंतर तुमच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे बँक 10 ते 15 दिवसांच्या आत परत करते. ही कागदपत्रे घेताना बँकेकडून नो ड्यूज सर्टिफिकेट (No Dues Certificate) नक्की घ्या. या सर्टिफिकेटमध्ये बँकेकडून लिहिले जाते की तुमच्यावर आता कोणत्याही प्रकारचे कर्ज बाकी नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 18, 2025 10:18 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Home Loan फोरक्लोज फायदेशीर आहे की नाही? नियम काय सांगतात? सोप्या भाषेत समजून घ्या!










