Saving Account मध्ये किती पैसे ठेवता येतात? RBI चा नियम काय?

Last Updated:

आपण आपल्या कष्टाचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतो. आरबीआयने आपल्या सुरक्षेसाठी अनेक नियम केले आहेत. अनेकांना काही नियम माहीत आहेत. यामध्ये, बहुतेकांना किमान बॅलेन्स चार्जविषयी माहिती आहे. पण, तुम्हाला माहिती आहे की सेव्हिंगमध्ये ठेवलेल्या कमाल रकमेवर काही मर्यादा आहे की नाही?

सेव्हिंग अकाउंट
सेव्हिंग अकाउंट
मुंबई : देशातील बहुतांश लोकांचे बँक अकाउंट आहे. या बँक अकाउंटद्वारे लोकांचे बहुतांश आर्थिक व्यवहार चालतात. यापैकी बहुतेकांना अकाउंटमध्ये किमान शिल्लक किती आहे हे माहित आहे. परंतु, याशिवाय, बँक अकाउंटशी संबंधित असे डझनभर नियम आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. खात्यात रोख रक्कम जमा करण्याची कमाल मर्यादा, एटीएम-डेबिट कार्डचे शुल्क, चेकचे शुल्क... इत्यादी अनेक गोष्टी आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने या सर्व गोष्टींबाबत डिटेल्स मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत.
अकाउंटमध्ये ठेवता येणारी जास्तीत जास्त रक्कम किती हे जाणून घेण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रत्येक बाबतीत तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये किमान रक्कम ठेवावी लागेल. किमान रक्कम नसल्यामुळे पेनाल्टी चार्ज कट करते. वेगवेगळ्या बँकांनी त्यांच्या स्वतःच्या किमान बॅलेन्स लिमिट निश्चित केल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये किमान बॅलेन्स लिमिट 1,000 रुपये आणि काहींमध्ये 10,000 रुपये आहे.
advertisement
कॅश जमा करण्याची मर्यादा
या सेव्हिंग अकाउंटमध्ये रोखीने पैसे जमा करण्याचीही लिमिट आहे. आयकर नियमांनुसार, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात त्याच्या बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपये रोख ठेवू शकते. यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा झाल्यास बँकांना त्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते. यासोबतच तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा करता तेव्हा तुम्हाला त्यासोबत पॅन क्रमांक द्यावा लागेल. तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत रोख जमा करू शकता. तसेच, जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये नियमितपणे रोख जमा करत नसाल तर ही मर्यादा 2.50 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
advertisement
10 लाखांची लिमिट
तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाखाच्या लिमिटपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली आणि आयकर रिटर्नमध्ये त्याच्या स्त्रोताविषयी समाधानकारक माहिती दिली नाही. तर छाननी शक्य आहे. या छाननीत तुम्ही पकडले गेल्यास तुम्हाला मोठा दंड ठोठावला जाईल. तुम्ही उत्पन्नाचा स्रोत उघड केला नाही, तर जमा रकमेवर 60 टक्के कर, 25 टक्के अधिभार आणि 4 टक्के उपकर लावला जाऊ शकतो.
advertisement
आपण सर्वजण आपली कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी बचत खात्यात पैसे जमा करतो. अशा परिस्थितीत त्याची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. परंतु, हे निश्चित आहे की जर तुम्ही अकाउंटमध्ये जास्त पैसे ठेवले आणि त्याच्या उत्पन्नाचा स्रोत उघड केला नाही, तर ते प्राप्तिकर विभागाच्या छाननीखाली येण्याची शक्यता आहे. जर उत्पन्नाचा स्रोत स्पष्ट असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
advertisement
दुसरे म्हणजे, तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये भरपूर पैसे ठेवले असतील, तर तुम्ही ते मुदत ठेवीमध्ये रूपांतरित करावे. हे तुम्हाला तुमच्या पैशावर योग्य रिटर्न देईल. बचत खात्यात जमा केलेल्या पैशावर अगदी नाममात्र परतावा मिळतो. बँकांमध्ये अल्प मुदतीपासून दीर्घ मुदतीच्या म्हणजे किमान सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या ठेव योजना आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या पैशावर चांगला रिटर्न मिळेल.
मराठी बातम्या/मनी/
Saving Account मध्ये किती पैसे ठेवता येतात? RBI चा नियम काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement