advertisement

FM Sitharaman: 'त्यांची टीका गांभीर्याने घेतो पण...' अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधींना फटकारलं

Last Updated:

राहुल गांधींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला डेड अर्थव्यवस्था' म्हटल्याचा उल्लेख केला होता, त्यावर सीतारामन यांनी सांगितलं की...

News18
News18
दिल्ली:  "विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया गंभीरपणे घेण्यास तयार आहोत, पण राहुल गांधींच्या टीकेमागे तथ्य नाहीत. बहुतेक वेळा मला वाटतं ते फक्त अंदाजावर बोलतात,  धोरणावरची टीका तथ्यांवर आधारित असावी' असं म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट 2026 वर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Network18 च्या संपादक राहुल जोशी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला.
"विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया गंभीरपणे घेण्यास तयार आहोत, पण गांधींच्या टीकेमागे तथ्य आणि माहिती नाही. राहुल गांधींच्या पदाचा आदर आहे, पण त्यांच्या टीकेत बहुतेक वेळा डेटा आणि पुरावा नसतो. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेता आहे. मला त्याला आणि त्याच्या निरीक्षणांना गंभीरपणे घ्यायचं आहे, जेणेकरून गोष्टी अधिक चांगल्या करता येतील. पण बहुतेक वेळा मला वाटतं ते फक्त अंदाजावर बोलतात,  धोरणावरची टीका तथ्यांवर आधारित असावी, असं म्हणत ,' असं म्हणत सीतारमन यांनी राहुल गांधींना टोला लगावला.
advertisement
'विश्वासार्ह विरोधी पक्ष लोकशाहीसाठी आवश्यक आहे, पण तो 'मजबूत आधारभूत माहिती'वर आधारित असावा, जेणेकरून सरकार योग्य उत्तर देऊ शकेल, असं सीतारमन म्हणाल्या. राहुल गांधींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला डेड अर्थव्यवस्था' म्हटल्याचा उल्लेख केला होता, त्यावर सीतारामन यांनी सांगितलं की, 'अशा टिप्पणींमुळे राहुल गांधींची स्वतःची भूमिका कमजोर करत आहेत. भारतात संसदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून  तुम्ही म्हणता की, तुम्ही डेड अर्थव्यवस्थेत राहता आहात का?' असं त्यांनी विचारलं आणि अशा विधानांमुळे राहुल गांधींच्या भूमिकेला धक्का बसतो, असंही सीतारमन यांनी म्हटलं.
advertisement
भारताला पुरावे आणि गांभीर्याने सरकारला आव्हान देणारा विरोधी पक्ष हवा आहे. कधी कधी तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय बोलता... मी काय उत्तर द्यावं? तुम्ही हवेतून बोलता. भारताला चांगला विरोधी पक्ष हवा आहे.' असा टोलाही सीतारमन यांनी लगावला.
रविवारीही सीतारामन यांनी विरोधी पक्षाच्या टीकेला थेट उत्तर दिलं, विशेषतः काँग्रेस नेत्यांनी बजेटला 'भारताच्या खरी संकटांपासून दूर' असल्याचं म्हटलं होतं. जसं की, बेरोजगारी, शेतकऱ्यांची अडचण आणि उत्पादनात मंदी. राहुल गांधींनी बजेटला 'मार्गदर्शन न करणारे, भारताच्या खरी संकटांकडे दुर्लक्ष करणारे बजेट' म्हटलं होतं आणि ते मुख्य आर्थिक समस्यांवर उपाय न करता फक्त भाषणबाजी आहे, असं म्हणत टीका केली होती.
advertisement
सीतारामन यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. 'मार्गदर्शन न करणारे बजेट असं काहीच नाही. अर्थव्यवस्था आणि तिची मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत. बजेटमध्ये MSMEs, शेतकरी, महिला उद्योजक आणि लहान व्यवसायांसाठी जागतिक अस्थिरतेपासून संरक्षण देण्यासाठी विशेष उपाय आहेत. राजकीय टीका फक्त तथ्यांवर आधारित असेल तरच स्वागतार्ह आहे, असं म्हणत सीतारमन यांनी राहुल गांधींना टोला लगावला.
view comments
मराठी बातम्या/मनी/
FM Sitharaman: 'त्यांची टीका गांभीर्याने घेतो पण...' अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधींना फटकारलं
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement