ITR Filling: ITR फाईल करताना काय काळजी घ्यावी? ती एक चूक ठरू शकते डोकेदुखी, CA चा सल्ला, Video

Last Updated:

ITR Filling: आर्थिक वर्ष संपल्यानंतर सर्व करपात्र उत्पन्न असणाऱ्या करदात्यांनी आयकर परतावा दाखल करणे गरजेचे असते. त्यामुळे आयटीआरबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

+
ITR

ITR Filling: ITR फाईल करताना काय काळजी घ्यावी? ती एक चूक ठरू शकते डोकेदुखी, CA चा सल्ला, Video

छत्रपती संभाजीनगर: एखादं आर्थिक वर्ष संपलं की नोकरदार असो की व्यावसायिक सर्वांनाच आयकर परतावा दाखल करावा लागतो. म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो. यासाठी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करू शकता. यंदा आयटीआर दाखल करण्यासाठी सरकारने 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. आयटीआर दाखल करताना आपल्याकडून काही चुका होऊ शकतात. मनस्ताप टाळण्यासाठी आधी त्या चुका टाळण्याची गरज असते. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील सीए रोहन आचलिया यांनी माहिती दिलीये.
जर तुम्हाला स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असेल तर तुम्ही आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट https://www.incometax.gov.in/ वर जावून आयकर परतावा दाखल करू शकता. त्यासाठी सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यावी लागते. यामध्ये कुठलेही चूक करू नये. जर एखादी चूक झाल्यास तुम्हाला परतावा मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते. याउलट तुमची चौकशी होऊन मनस्तापाला सामोरं जावं लागू शकतं, असं सीए रोहन सांगतात.
advertisement
कुणी कोणता आयटीआर भरावा?
करपात्र उत्पन्न असणाऱ्या सर्वांनी आयकर परतावा दाखल करण्याची गरज असते. नोकरदारांनी आयटीआर वन आणि आयटीआर टू अंतर्गत आयकर परतावा दाखल करावा. तर व्यावसायिकांनी आयटीआर तीन आणि आयटीआर 4 प्रमाणे परतावा दाखल करावा. त्यांच्याकडे ज्या प्रकारचे उत्पन्न आहे, त्यानुसार आयटीआर भरावा लागतो. जर परतावा मिळत असेल तर तो तुमच्या पॅनकार्डला संलग्न बँक खात्यात मिळेल, असंही सीए रोहन यांनी सांगितलं.
advertisement
सीएकडून भरावा आयटीआर
आयटीआर फाईल करताना ऑनलाईन पद्धतीने स्वत:ही भरू शकता. परंतु, शक्यतो सीएकडून आयकर परतावा दाखल करणे चांगले. आयकर परतावा भरताना झालेली एखादी चूक देखील डोकेदुखीचे कारण ठरू शकते. त्यामुळे सीएकडून आयकर परतावा दाखल केल्यास अचूक माहिती भरली जाईल. तसेच सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून आयकर परतावा दाखल करणाऱ्या सर्व माहितीची पूर्तता होईल, असेही सीए सांगतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
ITR Filling: ITR फाईल करताना काय काळजी घ्यावी? ती एक चूक ठरू शकते डोकेदुखी, CA चा सल्ला, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement