Income Tax वाचवण्याची भन्नाट ट्रिक, गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट पर्याय कोणते? आत्ताच पाहून घ्या
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Income Tax Saving schemes : जास्त आयकर भरावा लागू नये, यासाठी आपण गुंतवणूक करावी लागते. आता पाहूयात कोणकोणत्या गुंतवणुकीसाठी टॅक्स वाचवता येईल.
Income Tax Saving schemes : नोकरदार वर्गासाठी टॅक्स डिक्लरेशन्स म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी कुठं आणि किती गुंतवणूक करायची? याचा प्रुफ द्यावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याआधी तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी पर्याय शोधावे लागतात. असे कोणते पर्याय आहेत? ज्यामुळे तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता? जाणून घ्या...
इन्कम टॅक्स रिटर्न भरणं होणार सोपं
येत्या काही दिवसांत करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे खूप सोपे होऊ शकते. केंद्र सरकार आयकर रिटर्न भरण्याचे नियम अतिशय सोपे करण्याच्या तयारीत आहे. जास्त आयकर भरावा लागू नये, यासाठी आपण गुंतवणूक करावी लागते. आता पाहूयात कोणकोणत्या गुंतवणुकीने टॅक्स वाचवता येईल?
नॅशनल पेन्शन स्कीम
advertisement
जर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये पैसे टाकत असाल, तर तुम्हाला दीड लाखांच्यावर अधिकच्या 50,000 पर्यंत टॅक्स वाचवता येईल.
भविष्य निर्वाह निधी
तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही एक अल्प बचत योजना आहे. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो.
सुकन्या समृद्धी योजना
advertisement
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चालवली जाते. या योजनेत गुंतवणूक करूनही तुम्ही कर वाचवू शकता. या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
नॅशनल पेंशन सिस्टिम
नॅशनल पेंशन सिस्टिम या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कर सूट देखील मिळवू शकता. ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे.
EPFO मध्ये गुंतवणूक
advertisement
तसेच अनेकजण कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPFO) गुंतवणूक करतात.या योजनेतही तुम्ही प्राप्तिकर 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेऊ शकता.
एज्युकेशन लोन
जर तुम्ही स्वतःसाठी, जोडीदारासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतलं असेल, तर तुम्हाला व्याजावर कर सवलत मिळू शकते.
हेल्थ इन्शुरन्स
जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल, तर त्याच्या हप्त्यांवर तुम्हाला दरवर्षी 25,000 रुपयांपर्यंतचं टॅक्स डिडक्शन घेता येईल.
advertisement
दरम्यान, हे सर्व जुन्या टॅक्स रिजीममध्ये गुंतवणूक करता येईल. नव्या टॅक्स रिजीममध्ये जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर मात्र तुम्हाला NPS हा एकच पर्याय शिल्लक राहातो. यावेळी टॅक्स रिजीमसाठी बजेटमध्ये काय घोषणा होते ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 12:16 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Income Tax वाचवण्याची भन्नाट ट्रिक, गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट पर्याय कोणते? आत्ताच पाहून घ्या