Indian Currency : भारताचा 1 रुपया तिथे 500च्या बरोबर, 'हा' देश तुमचं नशीब बदलू शकतो

Last Updated:

जगात असा एक देश आहे, जिथे भारतीय रुपयाची किंमत 500 पट जास्त आहे? म्हणजेच, जर तुम्ही त्या देशात 1 भारतीय रुपया दिलात, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला तब्बल 500 रुपये मिळतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतीय रुपयाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसेंदिवस घसरताना दिसते. डॉलरच्या तुलनेत रुपया सध्या सुमारे 83 रुपये प्रति डॉलर या दराने व्यवहारात आहे. म्हणजेच भारताला एका अमेरिकन डॉलरसाठी 83 रुपये द्यावे लागतात. पण तुम्हाला माहितीय का, जगात असा एक देश आहे, जिथे भारतीय रुपयाची किंमत 500 पट जास्त आहे? म्हणजेच, जर तुम्ही त्या देशात 1 भारतीय रुपया दिलात, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला तब्बल 500 रुपये मिळतात.
हो, हे खरं आहे. आता तु्म्हाला तो देश कोणता असेल? असा प्रश्न पडला असेल ना? तर आणि तो देश म्हणजे इराण (Iran).
इराणमध्ये भारतीय रुपयाची जबरदस्त किंमत. इराणचं चलन रियाल (Iranian Rial) म्हणून ओळखलं जातं. सध्या 1 भारतीय रुपया = 507.22 इराणी रियाल इतका दर आहे. म्हणजे, जर तुम्ही फक्त ₹10,000 घेऊन इराणला गेलात, तर तिथे तुम्ही राजासारखं आयुष्य जगू शकता.
advertisement
इराणमधील 5-स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका दिवसाचा खर्च फक्त ₹7,000 इतकाच येतो. तर मध्यम श्रेणीच्या हॉटेलमध्ये ₹2,000 ते ₹4,000 दरम्यानचं बजेट पुरेसं ठरतं.
इराणी चलन एवढं कमकुवत का झालं?
इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. परंतु, अमेरिकेने लादलेल्या दीर्घकालीन आर्थिक निर्बंधांमुळे त्याची अर्थव्यवस्था कोसळली. अमेरिकेच्या दबावामुळे अनेक देशांनी इराणकडून तेल खरेदी बंद केली, ज्यामुळे त्याच्या चलनाचं मूल्य सतत कमी होत गेलं.
advertisement
2012 पासून इराणी रियालचं अवमूल्यन झपाट्याने होत आहे. सध्या देशात महागाईचा दर इतिहासातील सर्वोच्च पातळीवर आहे आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
डॉलर इराणमध्ये ‘गुन्हा’
इराणमध्ये अमेरिकन डॉलर वापरणं हा कायदेशीर गुन्हा आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे देशात डॉलरवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे काळ्या बाजारात डॉलरची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
advertisement
इराण काही निवडक देशांशी जसे भारत आणि चीन स्थानिक चलनात व्यापार करतो.
इतर देश जिथे रुपया ‘मजबूत’ आहे
इराणसारख्याच काही देशांमध्ये भारतीय रुपया अधिक मूल्यवान आहे:
सिएरा लिओन : 1 भारतीय रुपया = 238.32 सिएरा लिओन लेओन
इंडोनेशिया : 1 भारतीय रुपया = 190 इंडोनेशियन रुपिया
म्हणजेच या देशांत तुम्ही कमी बजेटमध्ये सुंदर प्रवासाचा आनंद घेऊ शकता.
advertisement
भारतीय रुपया जगातील बहुतेक देशांच्या तुलनेत कमकुवत असला, तरी इराणसारख्या देशात तो “महागडा” चलन ठरतो.
म्हणूनच, जर तुम्ही बजेटमध्ये आंतरराष्ट्रीय ट्रिपची योजना करत असाल, तर इराणसारख्या देशांचा विचार जरूर करा. जिथे भारतीय रुपये तुम्हाला खरंच मालामाल करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Indian Currency : भारताचा 1 रुपया तिथे 500च्या बरोबर, 'हा' देश तुमचं नशीब बदलू शकतो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement