फक्त 1 लाख गुंतवा आणि 11 पट परतावा मिळवा, प्रत्येक वर्षात दिलाय भरगोस रिटर्न
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चक्रवाढीची जादू: दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठा निधी उभारू शकता. अशीच एक योजना आहे - इन्व्हेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड. ही योजना सातत्याने उच्च कामगिरी करणारी असल्याचे सिद्ध झाली आहे. या योजनेने वर्षानुवर्षे चांगले परतावे दिले आहेत.
मुंबई: म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानले जातात. योग्य फंडमध्ये योग्य वेळी गुंतवणूक केल्यास तुमच्या संपत्तीत जबरदस्त वाढ होऊ शकते. अशीच एक उच्च परफॉर्मन्स देणारी स्कीम म्हणजे इनवेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड (Invesco India Contra Fund). गेल्या अनेक वर्षांपासून या स्कीमने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
22 वर्षांचा यशस्वी प्रवास!
इनवेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड ही इनवेस्को म्युच्युअल फंडची एक प्रसिद्ध कॉन्ट्रा स्कीम आहे. ही स्कीम 11 एप्रिल 2007 रोजी सुरू करण्यात आली होती आणि आज 22 वर्षांनंतरही ती उच्च परतावा देणाऱ्या फंडांमध्ये गणली जाते.
लॉन्च झाल्यापासून या फंडाने 14.70% वार्षिक परतावा दिला आहे. जर कोणी 2007 मध्ये या फंडात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज ती रक्कम 11.57 लाख रुपयांपर्यंत वाढली असती!
advertisement
किती मिळतोय परतावा?
या फंडाने वेळोवेळी गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा दिला आहे. खालील आकडेवारी पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की छोटीशी गुंतवणूकही मोठ्या संपत्तीत रूपांतरित होऊ शकते.
1 वर्षात: 1 लाखाचे 1.06 लाख रुपये
advertisement
3 वर्षात: 1 लाखाचे 1.58 लाख रुपये
5 वर्षात: 1 लाखाचे 2.39 लाख रुपये
7 वर्षात: 1 लाखाचे 2.48 लाख रुपये
10 वर्षात: 1 लाखाचे 3.62 लाख रुपये
हे आकडे स्पष्ट करतात की धीर धरा आणि संयम ठेवा, गुंतवणूक वाढेल, गडबड करुन पैसे काढलेत तर नुकसान होऊ शकतं. पैसे बुडण्याचा धोका असतो. इनवेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड हा विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक दिग्गज कंपन्या आहेत, कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी याचा सल्ला काही तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
HDFC Bank
ICICI Bank
Infosys
Axis Bank
Mahindra & Mahindra
Apollo Hospitals
Zomato
NTPC
Larsen & Toubro (L&T)
गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
या कंपन्यांचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानले जातात. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जरी इनवेस्को इंडिया कॉन्ट्रा फंडने भक्कम परतावा दिला असला तरीही भविष्यातील परताव्याची खात्री देता येत नाही.
advertisement
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. इक्विटी म्युच्युअल फंडांचे मागील परतावे भविष्यात अशाच कामगिरीची हमी मानले जाऊ शकत नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Location :
First Published :
March 17, 2025 7:45 AM IST