Invest In Stock: आज 1 उद्या 10, गुंतवणुकीचा गेमच बदलणार; फक्त रेकॉर्ड डेट लक्षात ठेवा, श्रीमंत होण्याची या वर्षातील मोठी संधी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Stock Market: अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या शेअर्सचे स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमी किमतीत जास्त शेअर्स मिळणार आहेत. यामुळे बाजारात लिक्विडिटी वाढणार असून, नव्या गुंतवणूकदारांसाठी हा मोठा लाभदायक निर्णय ठरू शकतो.
भारतीय शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांना प्रचंड नुकसान झाले आहे. एका बाजूला सर्व एक्सपर्ट सावध गुंतवणुक करण्याचा सल्ला देत आहेत अशात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी मोठी संधी आहे. सिका इंटरप्लांट सिस्टम्स लिमिटेड, ब्लू पर्ल एग्रीवेंचर्स लिमिटेड, लास्ट माइल एंटरप्रायझेस लिमिटेड, ऑप्टिमस फायनान्स लिमिटेड, शुक्रा फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि सोफट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या सहा कंपन्यांनी त्यांच्या शेअर्सच्या स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्टॉक स्प्लिटमुळे गुंतवणूकदारांना फायदा कसा होईल: स्वस्त शेअर्स: शेअर्सच्या किमती कमी झाल्यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठी हे फायदेशीर ठरेल, जास्त लिक्विडिटी: अधिक शेअर्स उपलब्ध झाल्याने खरेदी-विक्री सुलभ होईल, नवीन गुंतवणूकदारांना संधी: शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदार सहज प्रवेश करू शकतील, कंपनीच्या शेअर्सना अधिक मागणी: कमी किमतीत जास्त शेअर्स मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल वाढेल.
advertisement
स्टॉक स्प्लिटनंतर गुंतवणूकदारांनी काय करावे: -स्टॉक स्प्लिट होणार असलेल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी कंपनीच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करावा. -स्टॉक स्प्लिटनंतर काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार होऊ शकतो, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी निवडावी. -रेकॉर्ड डेटपूर्वी गुंतवणूक केल्यास स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळेल.
advertisement
स्टॉक स्प्लिटमुळे गुंतवणूकदारांना अधिक शेअर्स मिळतील, पण त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या मूल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, शेअर्सची लिक्विडिटी आणि मागणी वाढू शकते. अशा प्रकारच्या बदलांमुळे शेअर बाजारात काही काळ अस्थिरता निर्माण होऊ शकते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी योग्य नियोजन करून निर्णय घ्यावा. (Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक धोका असलेली असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या.)