advertisement

प्रॅक्टिस मॅचमध्ये टाकली एकच ओव्हर, मॅच विनरला दुखापत, T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला झटका!

Last Updated:
7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया ट्रॉफी वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे, पण वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.
1/6
टी-20 वर्ल्ड कपच्या आधी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाली होती, त्यामुळे दोघं न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळले नव्हते. तिलक वर्मा वर्ल्ड कपआधी पूर्णपणे फिट झाला आहे, पण सुंदरच्या खेळण्याचा सस्पेन्स अजून कायम आहे.

2/6
तिलक आणि सुंदरनंतर टीम इंडियाच्या आणखी एका मॅच विनरने कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीरचं टेन्शन वाढवलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात या खेळाडूने फक्त एकच ओव्हर बॉलिंग केली.

3/6
बुधवारी रात्री नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सराव सामना झाला. या सामन्यात हर्षित राणा एका ओव्हरमध्ये 16 रन दिल्यानंतर मैदानाबाहेर गेला.

4/6
बॉलिंग टाकत असताना हर्षित राणाने दोन वेळा आपला रन अप थांबवला आणि त्यानंतर गुडघा पकडला, यानंतर राणा मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये गेला. मागच्या काही महिन्यांमध्ये हर्षितने बॉल आणि बॅटने टीम इंडियासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

5/6
हर्षित राणा भारताकडून 2 टेस्ट, 14 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला, ज्यात त्याने टी-20 मध्ये 9, वनडेमध्ये 26 आणि टेस्टमध्ये 4 विकेट घेतल्या. वनडेमध्ये हर्षित राणाने एक अर्धशतकही केलं आहे. बॉलिंगसोबत आठव्या क्रमांकावरच्या उपयुक्त बॅटिंगमुळे हर्षित राणा टीमसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरत आहे.

6/6
प्रॅक्टिस मॅचदरम्यान हर्षित राणाला झालेली दुखापत फार गंभीर नसेल, अशीच अपेक्षा भारतीय टीम आणि चाहत्यांची असेल. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला मुंबईमध्ये युएसएविरुद्ध होणार आहे.

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement