लेह -लडाखला फिरायचं? आजच बुक करा हे IRCTC चं टूर पॅकेज; स्वस्तात मस्त मिळतील सगळ्या सेवा
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
उत्तरेकडील लेह-लडाख, काश्मीर, मनाली, उत्तराखंड अशा ठिकाणी अनेक जण फिरायला जातात. तुम्हालाही लडाखला फिरायला जायचं असेल, तर भारतीय रेल्वे विभागाची कंपनी आयआरसीटीसीच्या पॅकेजचा विचार करायला हरकत नाही. यात प्रवास, राहण्या-खाण्याचा खर्च तसंच फिरण्याचा खर्चही समाविष्ट आहे.
मुंबई : भारतात फिरण्यासाठी अनेक प्रकारची पर्यटनस्थळं आहेत. त्यापैकी उत्तरेकडील लेह-लडाख, काश्मीर, मनाली, उत्तराखंड अशा ठिकाणी अनेक जण फिरायला जातात. तुम्हालाही लडाखला फिरायला जायचं असेल, तर भारतीय रेल्वे विभागाची कंपनी आयआरसीटीसीच्या पॅकेजचा विचार करायला हरकत नाही. यात प्रवास, राहण्या-खाण्याचा खर्च तसंच फिरण्याचा खर्चही समाविष्ट आहे.
ज्यांना साहसी पर्यटन करायला आवडतं, त्यांच्यासाठी लडाख हे उत्तम पर्यटनस्थळ आहे. तिथे वेगवेगळ्या मार्गाने जाता येतं. काही जण बाईकवरूनही तिथे दौरे करतात. लडाखला जाण्यासाठी सध्या आयआरसीटीसीने ‘मॅग्निफिसंट लडाख’ हे एक पॅकेज दिलं आहे. हे पॅकेज ऑगस्ट महिन्याकरता आहे.
आयआरसीटीसीचं हे पॅकेज सहा रात्री व सात दिवसांचं आहे. पर्यटक यात लेह, नुब्रा, पँगाँग, टूरटूक अशा ठिकाणची सैर करू शकतात. पाच ऑगस्ट 2024 बेंगळुरूमधून ट्रिप सुरू होईल. हे पॅकेज बुक करण्यासाठी ग्राहकांना 57 हजार 700 रुपये खर्च करावे लागतील. विशेष म्हणजे या ट्रिपमध्ये पर्यटकांना विमानातून लडाखला जाता व येता येणार आहे.
advertisement
हे पॅकेज बुक करायचं असेल, तर रेल्वेची अधिकृत वेबसाईट www.irctctourism.com यावर जाऊन करता येऊ शकतं. इतर काही शंका असल्यास 8595931291 आणि 8595931292 या दोन हेल्पलाईन क्रमांकांवर फोन, मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज करता येऊ शकतो.
advertisement
लडाखमध्ये काय पाहाल?
लडाख हे साहसी पर्यटनाचं उत्तम ठिकाण आहे. तिथे ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने तिथे जाणाऱ्या पर्यटकांना पुरेशी काळजी घ्यावी लागते. तिथे शाम व्हॅली, लेह, नुब्रा, टूरटूक आणि पँगाँग ही काही फिरण्याची ठिकाणं आहेत.
लडाखच्या ट्रिपसाठी जर सिंगल शेअरिंगमध्ये तिकीट बुक केलं, तर 62,950 रुपये लागतील. डबल शेअरिंगसाठी 58,200 रुपये लागतील. ट्रिपल शेअरिंगचा पर्यायही आहे. त्याकरता 57,700 रुपये इतका खर्च येईल. सोबत पाच ते 11 वर्षं वयाचं मूल असेल व त्याकरता बेड घ्यायचा असेल तर त्यासाठी 56,450 रुपये भरावे लागतील. दोन ते 11 वर्ष वयाचं मूल असेल व त्याच्यासाठी बेड घ्यायचा नसेल, तर 51,850 रुपये लागतील. या पॅकेजमध्ये अगदी दोन वर्ष वयाच्या मुलासाठीही पैसे भरावे लागतील.
advertisement
लडाखमध्ये पश्मिना शाली, स्टोल, लोकरीचे कपडे चांगले मिळतात. इथले हाताने विणलेले गालिचे आणि शाली घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. लडाखमध्ये गेल्यावर स्थानिक भोजनाचा जरूर आस्वाद घ्या. त्यात स्कू, थुकपा (कणकेपासून बनवलेले), पावा (सातूपासून तयार केलेले), खंबीर (स्थानिक पोळीचा प्रकार) हे काही खास पदार्थ खायला मिळतील. थुकपा हा तिथला लोकप्रिय पदार्थ आहे.
advertisement
लडाखच्या ट्रिपमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाची लहान मुले असतील, तर एमबीबीएस डॉक्टरकडून किंवा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रवास करण्यास योग्य असे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्याचप्रमाणे 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रवाशांसाठीही फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याकरता बुकिंग करतानाच अर्ज डाउनलोड करता येईल. त्यासाठी खालील लिंक उपयुक्त ठरू शकतात.
मेडिकल सर्टिफिकेट अर्ज डाउनलोड करण्यासाठी अर्ज https://www.irctctourism.com//packagedetails/Medical%20form.pdf
advertisement
तिकीट बुक करण्यासाठी https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=SBA08
पॅकेजची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=SBA08
अधिक माहितीकरता खालील हेल्पलाइन क्रमांकांवर फोन करू शकता.
स्थानिक कार्यालय (बेंगळुरू) - 080-43023088, 8595931291
पर्यटन माहिती केंद्र (बेंगळुरू) - 080 - 22960013, 8595931292
पर्यटन माहिती केंद्र (हुबळी) - 8595931293
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 26, 2024 11:51 PM IST
मराठी बातम्या/मनी/
लेह -लडाखला फिरायचं? आजच बुक करा हे IRCTC चं टूर पॅकेज; स्वस्तात मस्त मिळतील सगळ्या सेवा